Pune Loksabha | नितीन गडकरी मांडणार पुण्याच्या विकासाचा रोडमॅप, कसबा विधानसभा मतदारसंघात जाहीर सभेचे आयोजन

पुणे  | पुणे लोकसभा (Pune Loksabha ) मतदारसंघ महायुतीचे लोकप्रिय उमेदवार मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांची जाहीर सभा शनिवार दि ११ मे रोजी सकाळी १० वाजता शुक्रवार पेठ येथील नातूबाग मैदानावर आयोजित करण्यात आली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने यांनी याबद्दलची माहिती दिली आहे.

पुणे शहर आणि जिल्ह्याच्या विकासासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाच्या माध्यमातून नितीन गडकरी यांनी हजारो कोटींचा निधी आजवर दिलेला आहे. शहराच्या विकासावर त्यांनी कायम विशेष लक्ष दिल्याने आज अनेक प्रकल्प निर्माण झाले आहेत. भविष्यात देखील केंद्र सरकारमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार येणार हे देशवासीयांनी ठरवलेलं आहे. पुणेकर नागरिकांचा देखील भाजपाच्या मागे राहण्याचा ठाम विश्वास आहे.

लोकसभा निवडणुकीच्या (Pune Loksabha) निमित्ताने नितीन गडकरी यांची पहिलीच सभा कसबा मतदारसंघात आयोजित करण्यात आली असून यावेळी त्यांचे विचार ऐकण्याची संधी मिळणार असल्याने नागरिकांमध्ये प्रचंड उत्साह असल्याची माहिती हेमंत रासने यांनी दिली आहे. पुणे लोकसभा मतदारसंघासाठी 13 मे रोजी मतदान पार पडणार असून 11 मे ला प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन