Pune News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात सापडला गांजा

Pune News | सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील मुलांच्या वसतिगृहात अमली पदार्थ सापडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना १४ मे रोजी उघडकीस आली. एवढा गंभीर प्रकार घडूनही पुणे विद्यापीठ प्रशासनाने यावर कोणतीही कारवाई केली नसल्याचे समोर आले आहे.

या घटनेला १० दिवस लोटल्यानंतरही काहीच ठोस कृती विद्यापीठ प्रशासनाकडून (Pune News) करण्यात आली नाही. केवळ या प्रकरणावर चौकशी समिती नेमण्यात येईल, असे सांगितले जात आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांनी विद्यापीठाच्या कारभारावर नाराजी व्यक्त केली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या (Savitribai Phule Pune University) मुलांचे वसतिगृह (Boys Hostel) क्रमांक ८ मध्ये सुमारे ७५० ग्रॅम गांजा (Marijuana) सापडला होता. यावर विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र, प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई न करता प्रकरण दडपले असल्याचा आरोप विविध विद्यार्थी संघटनांनी केला आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप