Ajit Pawar | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा प्रयत्न, अजित पवारांचा कोल्हेंवर नाव न घेत घणाघात

ओतूर | शिवसंस्कारसृष्टीची वडजची जागा हडपण्याचा ते प्रयत्न करत होते,असा गंभीर आरोप उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी कोल्हे यांचे नाव न घेता केला.ती जागा आता वाचवायची आहे,अशी पुष्टीही त्यांनी दिली.

महायुतीचे शिरुरचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil) यांच्या प्रचारासाठी ओतूर येथे बुधवारी (ता.८) आयोजित सभेत ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की, मागील वेळी कोल्हेंना तिकीट दिलं ही माझी राजकीय जीवनातली चूक होती, ती चूक सुधारण्यासाठी मी आलोय. खासदार म्हणून निवडून आल्यावर ते चित्रपट आणि मालिकांमध्येच रमले. आदीवासी भागात फिरकले नाहीत की कोणाला भेटले नाहीत यावेळी मात्र बिनकामाचा नको तर कामाचा माणूस म्हणून आढळराव यांना लोकसभेत पाठवा,असे आवाहन त्यांनी (Ajit Pawar) केले.

विधान परिषदेचे गटनेते भाजप आमदार प्रवीण दरेकर,जुन्नरचे आमदार अतुल बेनके,माजी आमदार शरद सोनवणे,भाजप नेत्या आशाताई बुचके, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष अंकुशराव लांडे, शरद बॅंकेचे अध्यक्ष देवेंद्र शहा, जुन्नर बाजार समिती सभापती ॲड.संजय काळे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष समद इनामदार, तालुकाध्यक्ष पांडूरंग पवार, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषनाना खैरे, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष पोपट राक्षे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष देवराम लांडे,माजी उपाध्यक्ष अरुण गीरे, गणपत फुलवडे, माजी आरोग्य सभापती मंगलदास बांदल,माजी सदस्य भानुविलास गाढवे, बबन तांबे, भाऊ देवाडे, विनायक तांबे, अभिजित शेरकर, विश्वास आमले, दिलीप डुंबरे, तान्हाजी तांबे, उज्वला शेवाळे, दत्ता गवारी तसेच महायुतीचे विविध पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आढळराव म्हणाले की, दत्तक घेतलेल्या गावाला देखील कोल्हे कधी गेले नाहीत,त्यांनी पाच वर्षे काही काम केले नाही,पण या बिनकामाच्या माणसांनं दोन तीन महिन्यात मात्र करामती केल्यात,वाट्टेल तसे बोलु लागलाय,बैलगाडा शर्यत मी सुरु केली,रेल्वे मी आणली ,अशा दोन आणि तीन महिन्यात कामे होत असतात का,असा टोला लगावत त्यांचं मानसिक संतुलन बिघडल्याचा आरोप त्यांनी केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन