Vilas Lande | विलास लांडे यांची नाराजी झाली दूर; भोसरी मतदारसंघातून मतांची मोठी आघाडी मिळण्याची शक्यता

Vilas Lande | राष्ट्रवादी पक्ष फुटीनंतर शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेतून राष्ट्रवादीत आलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून तिकीट देण्यात आले. मात्र आढळरावांच्या उमेदवारीनंतर भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी तर कडाडून विरोध करत आढळरावांचा प्रचार करण्यापेक्षा राजकारण सोडून देणार अशी भूमिका घेतली होती. मात्र अजितदादांच्या समजूतीनंतर आता लांडे आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत.

दुसऱ्या पक्षातील नेत्यांना उमेदवारी नकोच, असे म्हणत अजितदादांच्या नेत्यांनी आढळरावांचा कडवा विरोध केला होता. मात्र अजित दादांनी सर्व नेत्यांची एकत्रित बैठक घेत स्थानिक नेत्यांची नाराजी दुर केली अन् आढळरावांचा प्रचार करण्याचा आदेश दिला. यामध्ये विलास लांडे यांची अधिक नाराजी दिसून आली. ते तर शरद पवार गटाच्या वाटेवरही असल्याचे सांगण्यात आले. मात्र अजितदादांच्या समजूतीनंतर आता लांडे शांत झाले असून आढळरावांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, आता विलास लांडे (Vilas Lande) यांची नाराजी दूर झाल्याने शिवाजीराव आढळराव पाटील  यांना मोठा दिलासा मिळणार आहे. विलास लांडे यांच्या बदललेल्या भूमिकेनंतर आता गेल्या निवडणुकीप्रमाणेच आढळरावांना मतांची मोठी आघाडी भोसरी मतदारसंघातून मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार