पहिली ते आठवीपर्यंत शाळेबाबत अजित पवारांनी घेतला मोठा निर्णय !

पुणे : पुण्यातील कोरोना बाधितांची दैनंदिन संख्या आता कमी होत आहे. त्यासोबतच लसीकरण सुद्धा वेगाने होत आहे. त्यामुळे आता पुण्यातील शाळांच्या संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील शाळा-महाविद्यालये 1 फेब्रुवारीपासून सुरू करण्याचा निर्णय घेतला. मात्र, पहिली ते आठवीचे वर्ग हे चार तासच भरवले जात होते. पण आता पहिली ते आठवीचे वर्ग हे पूर्ण वेळ भरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पुण्यातील कोरोनाच्या स्थितीच्या आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

तर, पुण्यातील जंबो कोवीड सेंटरमधे कोणताही घोटाळा नाही. विरोधी पक्षातील लोक आरोप करतात, पण पुढे त्याच काय होतं. अनेकदा माफी मागुन मोकळे होतात असे अजित पवार म्हणाले. सुशील खोडवेकरला टी ई टी परिक्षेतील गैरव्यवहारात अटक झाल्यानंतर मुख्यमंत्र्यानी याची माहिती घेतली आहे. माहिती घेणं हे मुख्यमंत्र्यांचे काम असल्याचे पवार यांनी सांगितले. पुण्यातील येरवडा भागातील दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत देण्यात येणार असल्याची माहिती पवार यांनी दिली. तसेच या घटनेबाबत जिल्ह्याधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती नेमण्यात आली आहे. त्याचबरोबर कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला देखील या अपघाताबाबत अहवाल देण्यास सांगण्यात आल्याचे पवार म्हणाले.

अजित पवार यांनी आज पुण्यात कोरोना आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. कोरोनाच्या रुग्णसंख्येत घट होत आहे पण मृत्यूच्या संख्येत वाढ दिसून येत आहे. पुण्यात, राज्यात, देशात आणि जगात हा ट्रेंड दिसून येतोय. 5 ते 18 वयोगटातील मुलांना देण्यासाठी जेवढी लस हवी तेवढी उपलब्ध नाही. त्यासाठी केंद्र सरकारशी संपर्क करणार असल्याचे पवार यावेळी म्हणाले.