Ramdas Kadam | अनंत गीते स्वतः साठी जगतात परंतु सुनिल तटकरे दुसर्‍यांसाठी जगतात म्हणून आम्ही त्यांच्यासोबत

Ramdas Kadam | अनंत गीते स्वतः साठी जगतात परंतु सुनिल तटकरे (Sunil Tatkare) दुसर्‍यांसाठी जगतात म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आहोत. त्यामुळे अनंत गीते यांचे डिपॉझीट सुनिल तटकरे नक्की जप्त करतील, असा ठाम विश्वास रामदास कदम (Ramdas Kadam) यांनी व्यक्त केला. रविवारी सकाळी चिपळूणमधील पालवण येथे तर दुपारी हेदवी आणि तिसरी गुहागर शहरात जाहीर प्रचार सभा पार पडली. या प्रचार सभेत ते बोलत होते.

ज्यांना मी आणले… ज्यांचा निवडणूक खर्च दोनवेळा केला ते अनंत गीते माझे होऊ शकले नाही तर ते समाजाचे काय होणार आहे असा सवालही रामदास कदम यांनी उपस्थित केला.

हा रायगडचा मावळा संसदेत जाणार आणि कॅबिनेटमंत्री सुध्दा होणार असा विश्वासही रामदास कदम यांनी व्यक्त केला दरम्याान या जाहीर प्रचार सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, माजी आमदार विनय नातू, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबाजी जाधव, शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, मनसे संपर्कप्रमुख प्रमोद गांधी, गुहागर माजी नगराध्यक्ष राजेश बेंडल, सिकंदर जसनाईक आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा