Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Jay Pawar | लोकसभा निवडणूकीत बारामती मतदार संघाकडे सध्या सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांच्या प्रचाराचा नारळ फोडला होता. यानंतर आता अजित पवार यांचे पुत्र जय पवार आईच्या प्रचारात उतरलेले आहेत, त्यांनी पहिल्यांदाच थेट सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्यावर टीका केली असून ”संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही’ असे म्हंटले आहे.

जय पवार (Jay Pawar) रॅली काढत असताना त्यांना प्रश्न उपस्थित केला गेला. तुम्ही अनेक वर्षापासून सुप्रिया ताईंना निवडून देत आहात, यावर जय पवार म्हणाले, “आज त्या म्हणत आहेत की मला संसदरत्न मिळाला आहे. मात्र भोर तालुक्याला काय मिळालं? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. संसदरत्न पुरस्कार हा मोठा पुरस्कार नाही. सरकारचा पुरस्कार नाही तो पुरस्कार एका एनजीओच्या माध्यमातून दिला जातो.” अशी जोरदार टीका जय पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केली आहे. पहिल्यांदाच त्यांनी अशी टीका केली आहे.

आता या टीकेला सुप्रिया सुळे काय उत्तर देणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | मुरलीधर मोहोळ यांचा सहाही विधानसभा मतदारसंघात प्रचाराचा धुराळा, विविध समाजघटकांकडून स्वागत

Amol Kolhe | दिल्लीचे तख्त पलटवण्याची ताकद महाराष्ट्राच्या मनगटात आहे

Sunil Shelke On Rohit Pawar: रोहित पवारांना अजितदादांची जागा घ्यायचीय, सुनील शेळकेंचा निशाणा