Amol Bhagat | बारामतीच्या सुपुत्रची अमेरिकेने घेतली दखल; अमोल भगतला हॉलीवुडचे तिकीट

Amol Bhagat | बारामती तालुक्यातील सायंबाची वाडी या छोट्याशा खेडेगावातील शेतकरी कुटुंबातील हरहुन्नरी युवक अमोल भगत (Amol Bhagat) याला अमेरिकेच्या मानाच्या असणाऱ्या नवव्या आंतरराष्ट्रीय सेटल फिल्म फेस्टिवल वॉशिंग्टन येथील फेस्टिवलमध्ये परीक्षक (ज्युरी) म्हणून निवड करण्यात आली आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून आणि शेतकरी कुटुंबातून अमोल भगतचा खडतर प्रवास सुरू झाला होता.
त्याच्या बारा वर्षाच्या भारतीय चित्रपट सृष्टीच्या मेहनतीच्या जोरावर त्याने हे यश संपादन केले आहे. आत्तापर्यंत 21 आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये परीक्षक म्हणून त्याने काम पाहिले आहे. तसेच त्याचा आगामी हिंदी चित्रपट पुणे टू गोवा लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. त्याच्या झालेल्या या निवडीने भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये तसेच बारामती व त्याच्या गावातील नागरिकांनी त्याच्यावर शुभेच्छा वर्षाव करून त्याच्या आगामी वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

यावेळी अमोल भगत असे म्हणाले की या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये मिळालेल्या संधीचे श्रेय मी माझ्या बारामतीकरांना तसेच आई-वडील व मित्र परिवारांच्या खंबीर साथीमुळेच हे शक्य झाले आहे. मी त्यांचा कायम ऋणी राहील व मिळालेल्या संधीचे सोनं करीन मराठी माणसाचा महाराष्ट्राचा आणि भारत देशाचा ठसा अमेरिकेत उमटवेल.

महत्वाच्या बातम्या-

NCP Maniesto |आरोग्य, शिक्षण,स्वच्छता, पर्यावरण आणि रोजगार या ग्रामविकासाच्या पंचसूत्रीवर राष्ट्रवादी काम करणार

एका रुग्णावर अनेक शस्त्रक्रिया झाल्या, हा आरोप धादांत खोटा; राणा जगजितसिंहांचे ओमराजेंना प्रत्युत्तर

१० वर्षांपूर्वी मनपाने वाघोलीतील पाणी प्रश्नासाठी निधी दिला होता, ते काम अजूनही अपूर्ण, शिवाजीदादांची कोल्हेंवर टीका