Hardik Pandya Divorce : घटस्फोटाच्या चर्चांदरम्यान कुणासोबत फिरताना दिसली हार्दिक पांड्याची बायको? Video Viral

Hardik Pandya Divorce : एकीकडे टीम इंडिया पुढच्या महिन्यात टी-20 वर्ल्ड कप (T20 World Cup) खेळण्याच्या तयारीत असताना दुसरीकडे उपकर्णधार हार्दिक पांड्याच्या (Hardik Pandya) पत्नी नताशा (Hardik Pandya Wife) सोबत घटस्फोट होणार असल्याची बातमी चर्चेत आहे. याच दरम्यान शनिवारी एक मोठे अपडेट देखील समोर आले आहे. अभिनेत्री दिशा पाटनीचा कथित बॉयफ्रेंड अलेक्झांडर ॲलेक्ससोबत नताशा स्टॅनकोविच शनिवारी सार्वजनिक ठिकाणी दिसली. नताशा आणि अलेक्झांडरचा व्हिडिओ समोर येताच तो सोशल मीडियावर वणव्यासारखा पसरला. या व्हिडिओमुळे नताशा-हार्दिकच्या घटस्फोटाच्या चर्चांनी अधिक जोर पकडला आहे.

शनिवारी नताशा अलेक्झांडरसोबत तिच्या अपार्टमेंटमधून बाहेर पडताच पापाराझींनी तिला घेरले. फोटोग्राफर्सच्या खूप विनंतीनंतर ॲलेक्सचे नताशासोबत काढलेले फोटोही मिळाले. यामुळे या प्रकरणाला खूप रंजक वळण मिळाले आहे. गेल्या काही दिवसांपासून हार्दिकच्या नताशासोबत घटस्फोट झाल्याच्या बातम्या मीडियाच्या वेगवेगळ्या वर्तुळातून येत आहेत. मात्र, कोणत्या कारणांमुळे त्यांचे नाते या टप्प्यावर पोहोचले हे स्पष्ट झालेले नाही.

आता गेल्या काही दिवसांपासून हार्दिकचा मैदानावरचा वेळ संघर्षाने भरलेला असताना, नताशा आपल्या पतीचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी त्याच सामन्यात उपस्थित नव्हती. हार्दिक आणि नताशाचे लग्न 2020 मध्ये झाले होते आणि दोघांना तीन वर्षांचा मुलगा आहे. नताशाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून पंड्या हे आडनाव हटवल्यानंतर दोघांच्या विभक्त होण्याच्या चर्चेला जोर आला आहे. यानंतर त्यांच्या वैवाहिक जीवनातील मतभेद आणि घटस्फोटाच्या बातम्यांनी चाहत्यांमध्ये जोर पकडला.

नताशासोबत दिसलेल्या अलेक्झांडरबद्दल सांगायचे तर, त्याच्या हातावर दिशाच्या चेहऱ्याचा टॅटू आहे. तो दिशा पटानीला डेट करत असल्याचं सर्वांना वाटतं. अशा परिस्थितीत तो नताशासोबत दिसणे थोडे धक्कादायक आहे.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Ashish Shelar | उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

KKR VS SRH | “आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक…”, फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार कमिन्सचे केकेआरला आवाहन