Hardik Pandya Divorce: टी२० विश्वचषकासाठी टीम इंडियासोबत न्यूयॉर्कला गेला नाही हार्दिक पांड्या, नताशा आहे कारण?

Hardik Pandya Divorce: भारतीय क्रिकेट संघाचचे काही खेळाडू न्यूयॉर्कला रवाना झाले आहेत. कर्णधार रोहित शर्मा, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा आणि सूर्यकुमार यादव यांच्यासह अनेक खेळाडू टी20 विश्वचषक 2024 साठी (T20 World Cup 2024) रवाना झाले आहेत. मात्र हार्दिक पांड्या, विराट कोहली आणि संजू सॅमसन हे अजूनही भारतातच आहेत. एका वृत्तानुसार, या तिन्ही खेळाडूंनी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडे नंतर सोडण्यासाठी अर्ज केला आहे.

हार्दिक पांड्याच्या आयुष्यात सध्या गोंधळ सुरू आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, पांड्या आणि त्याची पत्नी नताशा स्टॅनकोविक घटस्फोट घेणार आहेत. मात्र याबाबत अद्याप दोन्ही बाजूंनी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. नताशा जवळच्या मित्रासोबत फिरताना दिसली आहे. त्यामुळे पंड्याबद्दल असा अंदाज वर्तवला जात आहे की, नताशासोबतच्या खराब संबंधांमुळे तो अद्याप न्यूयॉर्कला जाऊ शकलेला नाही.

नताशा आणि पांड्याने 2020 मध्ये लग्न केले. मुंबईत एका पार्टीदरम्यान दोघांची भेट झाली. यानंतर त्यांच्या मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले आणि त्यानंतर त्यांनी लग्न केले. पण आता घटस्फोटाची परिस्थिती आली आहे. या दोघांमधील नाते बिघडण्याचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. हार्दिकने अद्याप कोणतेही वक्तव्य केलेले नाही.

महत्वाच्या बातम्या-

Jitendra Awad | जितेंद्र आव्हाड यांनी बीडच्या सीमेवर येऊन नाक घासून माफी मागावी, भाजपची मागणी

Ashish Shelar | उद्धव ठाकरे लंडनची नालेसफाई पहायला गेलेत का?, आशिष शेलार यांचा सवाल

KKR VS SRH | “आम्ही सर्वोत्तम संघांपैकी एक…”, फायनलपूर्वी हैदराबादचा कर्णधार कमिन्सचे केकेआरला आवाहन