Anant Geete | “अनंत गीते स्वतः च्या सावलीला भीत आले म्हणूनच इतक्या वर्षात त्यांनी समाजातील एकाही नेतृत्व उभे केले नाही”

Anant Geete | माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्याकडे काही काळ अवजड उद्योग खाते असताना त्यांनी रेल्वे बोगीचा कारखाना लातूरमध्ये नेला तर खासदार प्रफुल पटेल यांच्याकडे काही महिने खाते असताना गोंदियामध्ये मोठा कारखाना नेला आणि हजारो लोकांना रोजगार उपलब्ध करून दिला मात्र या अनंत गीतेंकडे (Anant Geete) दोनवेळा हेच खाते असताना माझ्या कोकणात किंवा या मतदारसंघात एखादा कारखाना उभा केला नाही किंवा रोजगार उपलब्ध केला नाही असा जोरदार हल्लाबोल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे यांनी महायुतीच्या पालवण येथील जाहीर प्रचार सभेत केला.

आठवेळा भाजपसोबत निवडणूका लढलेले अनंत गीते आज त्याच भाजपवर आरोप करत आहेत एवढा कृतघ्न माणूस कुठे पाहिला नाही अशी घणाघाती टीका सुनिल तटकरे यांनी केली. अनंत गीते स्वतः च्या सावलीला भीत आले म्हणूनच त्यांनी इतक्या वर्षात समाजातील एकाही नेतृत्वाला उभे केले नाही असा थेट आरोप सुनिल तटकरे यांनी केला.

अजित पवार यांनी पाच कोटी रुपये देऊन पाया रचला आणि एकनाथ शिंदे यांनी ७ कोटी देऊन कळस ठेवला त्यामुळे समाजोन्नती संघाची वास्तू मुलुंड सारख्या ठिकाणी उभी राहिली. याचा आनंद व्यक्त न करता अतिशय दु:ख झाल्याने त्या वास्तूच्या उद्घाटनालाही अनंत गीते आले नाहीत ही शोकांतिका आहे अशा शब्दात सुनिल तटकरे यांनी समाचार घेतला.

प्रगतशील राज्यात जेवढा विकास झाला त्याचपटीने ईशान्य भागातही पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभ्या केल्या आहेत. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली अयोध्येत राममंदिर उभे राहिले याचा अभिमान आम्हाला आहेच त्याचबरोबर ते मुस्लिम बांधवांची मशिदही उभी करत आहेत हे मात्र मुस्लिम समाजाला न सांगता निवडणूकीत प्रचाराला मुद्दे नसल्याने समाजासमाजामध्ये दुषित वातावरण निर्माण करुन नरेंद्र मोदींना नाहक बदनाम करु पहात आहेत हे खपवून घेतले जाणार नाही असा इशाराही सुनिल तटकरे यांनी दिला.

कोकणाला ७२० किलोमीटरची समुद्र किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीवर मोठया प्रमाणात पायाभूत सुविधा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभारल्या आहेत हे आमचे काम आहे असे सांगतानाच माझ्या कोकणातील तरुण मोठया प्रमाणात मुंबईकडे स्थलांतरित होत आहे. त्यांना त्यांच्या घराजवळ रोजगार कसा उपलब्ध करता येईल यादृष्टीने माझा प्रयत्न सुरू आहे असा शब्दही सुनिल तटकरे यांनी दिला.

पुढील पाच वर्षे रोडमॅप ठेवून काम करणार आहे. तुम्ही मला घड्याळ चिन्हावर मतदान करुन साथ द्या तुमच्यासोबत कायम राहिन असा विश्वास सुनिल तटकरे यांनी जनतेला दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा