Sunil Tatkare | संविधान बदलाच्या नावाने देशाच्या एकात्मतेला इंडिया आघाडीकडून तडा दिला जातोय

Sunil Tatkare | जोपर्यंत चंद्र – सुर्य आहे तोपर्यंत संविधान बदलले जाणार नाही. मात्र दुषित वातावरण निर्माण करुन देशाच्या एकात्मतेला तडा देण्याचे काम सोकॉल इंडिया आघाडीकडून दिला जात आहे त्यांच्यापासून सावध व्हा असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी केळशी येथे केले.

नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात प्रगती झाली आणि जगात विकसित भारत म्हणून नाव उदयास आणले आहे. खेड्यापाड्यातील विकास केला जातो तेव्हा तो देशाला विकासाकडे नेतो. महिलांसाठी ३३ टक्के आरक्षण नरेंद्र मोदी यांनी जाहीर केले. ज्या देशात नारी शक्तीचा सन्मान होतो तो देश नक्कीच प्रगतीपथावर वाटचाल करतो असा विश्वास सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

कुणबी समाजाची १२ कोटींची वास्तू मुलुंड परिसरात उभी राहिली आहे. त्या वास्तूच्या उद्घाटनाला अनंत गीते निमंत्रण देऊनही आले नाही अशी कुत्सित बुध्दी पहायला मिळाले. या अनंत गीते यांनी समाजाचा एकही माणूस पुढे आणला नाही असा थेट हल्लाबोल सुनिल तटकरे यांनी केला.

अनंत गीते ३० वर्षात काय केले हे मतदारसंघात फिरताना सांगा असे आवाहन करतो मात्र अनंत गीते यांच्याकडे ३० वर्षात केलेले काम सांगण्यासारखे काहीच नसल्याने ते जातीचे राजकारण करत आहेत असा आरोपही सुनिल तटकरे यांनी केला.

गेल्या दहा वर्षात जलदगतीने कोकणात अनेक विकासकामे आणि पायाभूत सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. हे सांगतानाच बहुजनांसाठी काय करणार आहोत याचा रोडमॅप माझा तयार आहे मात्र अनंत गीते यांच्या भाषणात बूच, बाटली आणि भूत या व्यतिरिक्त काहीच नसते. ज्यांनी कित्येक वर्षे संसदेत काम केले त्यांची अशी भाषा असेल तर यांच्याकडून काय अपेक्षा ठेवायची असा सवालही सुनिल तटकरे यांनी उपस्थित केला. वार्‍याची जशी सुखद झुळुक येते आणि शरीराला विसावा वाटतो तशी विकासाची सुखद झुळुक तुमच्या मतदारसंघात आल्याशिवाय राहणार नाही असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

या महायुतीच्या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे, माजी मंत्री रामदास कदम, आमदार योगेश कदम, माजी आमदार सुर्यकांत दळवी, भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे,शिवसेना जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, माजी आमदार अशोक पाटील आरपीआयचे तालुकाध्यक्ष प्रितम उके, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला तालुकाध्यक्षा साधना बोथरे आदींसह महायुतीचे तालुकाध्यक्ष, तालुकाप्रमुख आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा