Chhatrapati Sambhaji Nagar | बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न पूर्ण, छत्रपती संभाजी नगरच्या नामांतरावर उच्च न्यायालयाचा शिक्कामोर्तब

छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) आणि धाराशीव शहरांच्या नामांतरावर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे स्वप्न खऱ्या अर्थाने पूर्ण झाले आहे. नामकरणाविरोधात न्यायालयात गेलेले लोक महाविकास आघाडीचे आहेत. या निर्णयामुळे दोन्ही शहरांच्या नावाला विरोध करणाऱ्यांना चपराक बसली असल्याची टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केली.

महायुतीचे उमेदवार संदीपान भुमरे यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे संभाजी नगर दौऱ्यावर आहेत. उच्च न्यायालयाने नामकरणाला विरोध करणाऱ्या याचिका फेटाळल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुंबई उच्च न्यायालयाने छत्रपती संभाजी नगर आणि धाराशीव या दोन्ही नावाला मान्यता देऊन या विरोधातील सर्व याचिका फेटाळल्या आहेत. जनभावना लक्षात घेऊन निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी उच्च न्यायालयाचे आभार मानले. तसेच संभाजीनगर आणि धाराशिवमधील नागरिकांचे अभिनंदन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

संभाजीनगर हा शिवसेना आणि महायुतीचा बालेकिल्ला आहे. छत्रपती संभाजी नगर (Chhatrapati Sambhaji Nagar) हे नाव व्हावे ही बाळासाहेब ठाकरे यांची मनापासूनची इच्छा होती. परंतु बाळासाहेबांचा वारसा सांगणारे, संपत्तीचे वारस असणाऱ्यांनी आम्ही सरकारमधून बाहेर पडल्यावर दिखाऊपणासाठी संभाजीनगरचा डाव रचला. परंतु त्यांच्याकडे बहुमत नसल्याने तो निर्णय बेकायदेशीर होता. त्यामुळे सरकार स्थापन केल्यावर आम्ही संभाजी नगरचा निर्णय घेतला. या निर्णयावरआज उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब केल्याने हा संभाजीनगरवासियांचा भव्य विज असल्याचे, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन