Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा

धाराशिव लोकसभा (Dharashiv LokSabha) मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) विरुद्ध महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर (Omraj Nimbalkar) यांच्यात थेट लढत होत आहे. दरम्यान 30 एप्रिल रोजी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते धाराशिव येथे राष्ट्रवादी काँग्रेस व महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्याकरिता एक मोठी सभा घेणार आहेत. या सभेची उत्सुकता धाराशिवरांना लागून राहिली आहे.

धाराशिव (Dharashiv LokSabha) येथे ते नरेंद्र मोदी प्रथमच येत असल्यामुळे धाराशिव येथील महिला, तरुण व ज्येष्ठ मंडळींमध्ये देखील उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांच्या या सभेमुळे महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांचे पारडं जड होईल अशी देखील चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे. आतापर्यंत अर्चनापाटील यांच्या प्रचाराकरिता राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री डॉ. तानाजी सावंत व महायुतीच्या सर्व आमदार यांनी प्रचार सभांचा धडाका लावला आहे. त्यातच आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील धाराशिव जिल्हा दौऱ्यावर येत असल्यामुळे या दौऱ्याविषयी सर्वसामान्य धाराशिवरांना उत्सुकता लागून राहिली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन