एकनाथ शिंदे यांच्या अडचणी वाढल्या, ‘त्या’ प्रकरणात न्यायालयाकडून चौकशीचे आदेश

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांनी निवडणूक आयोगाला (Election Commission) दिलेल्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीची चुकीची माहिती दिल्याचा आरोप  करत पुण्यातील माहिती अधिकार कार्यकर्ता अभिषेक हरदास (Abhishek Hardas) यांनी कोर्टात याचिका दाखल केली आहे. न्यायायालयाने या याचिकेची दखल घेतली असून या प्रकरणात चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

पुणे न्यायालयातील मुख्य न्यायदंडाधिकारी कोर्टात केस दाखल करण्यात आली असून सदर केस मध्ये दखल घेऊन साक्षी पुरावे तपासण्याचे सी आर पी सी 200 अन्वये आदेश दिले आहेत. शिंदे यांनी 2009, 2014 आणि 2019 साली ठाण्यातील कोपरी-पाचपाखाडी विधानसभा (Kopari-Pachpakhadi Assembly) मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल करताना सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रांमध्ये त्यांच्या शिक्षणाच्या नोंदीसह मालमत्तेच्या तपशिलात तफावत असल्याचे याचिकेत नमूद करण्यात आले आहे.

सन 2009, 2014 मध्ये एकनाथ शिंदे यांनी 147, कोपरी पाचपाखाडी विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रासोबत शपथपत्र सादर केले होते. त्यानंतर त्यांनी 2019 ला 147,कोपरी पाचपाखाडी विधानसभा मतदारसंघातून महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीकरिता नामनिर्देशन पत्रा सोबत शपथपत्र सादर केले. एकनाथ शिंदे यांनी सन 2014 व 2019 मध्ये निवडणुकीकरीता दिलेल्या नामनिर्देशन अनेक तफावती दिसून येत आहेत.