Sunil Tatkare | तटकरेंचे जनतेला मोठे मताधिक्य मिळवून देण्याचे आवाहन; म्हणाले, ‘मागील निवडणुकीत मी पिछाडीवर होतो, यंदा… ‘

Sunil Tatkare | देशाच्या भवितव्याची जडणघडण करण्याच्यादृष्टीकोनातून महत्वपूर्ण निवडणूक असून माझ्या पाठीशी मतदानरुपी ताकद उभी करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare ) यांनी पाजपंढरी येथे केले.

मागील निवडणुकीत या मतदारसंघात पिछाडीवर होतो मात्र यावेळी या मतदारसंघात श्रीवर्धन मतदारसंघापेक्षा सरस मताधिक्य माझ्या पारड्यात देईल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

उध्दव ठाकरे यांनी कॉंग्रेससोबत केलेली युती चालते मात्र आम्ही भाजपसोबत गेल्यावर आमच्यावर टिका केली जाते. अहो बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्या उध्दव ठाकरे तुम्हाला आमच्यावर बोलण्याचा नैतिक अधिकार नाही असा थेट हल्लाबोलही सुनिल तटकरे यांनी केला. मुंबईतील ससून डॉक हे महत्वाचे केंद्र मानले जात होते त्याप्रमाणे हर्णे आणि पाजपंढरी बंदरात डॉक उभे केले जाईल असा शब्द सुनिल तटकरे यांनी दिला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा