संजय राऊत तुमची आता कीव येते; अतुल भातखळकरांचा संजय राऊत यांना टोला

मुंबई : शिवसेना खासदार यांनी इडीविरोधात आणि भाजप विरोधात आक्रमक भूमिका घेतल्यानंतर भाजपने देखील संजय राऊत यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील राऊत यांना प्रत्युत्तर दिले आहे. तर अशातच आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी संजय राऊत यांच्या वर निशाणा साधला आहे.

काल पर्यंत अर्वाच्य भाषेत, घाणेरड्या भाषेत देशाच्या पंतप्रधानांपासून भाजपच्या छोट्या कार्यकर्त्यांना टीका करणारे राऊत साहेब आता इडीला सामोरे जा ना. कर नाही त्याला डर कसली. आता राऊत यांना लोकशाही आठवायला लागली आहे. राऊत साहेब आता तुमची मला कीव येते. काळजी करू नका. इडी तुमची चौकशी करेल. ती कायद्यानुसारच करेल. तथाकथित बोगस डिग्रीच्या नावाखाली एका महिलेला ४७ दिवस तुरूंगात पाठवलं. किरीट सोमय्यांना हल्ला केल्यानंतर सामना मध्ये त्यांच्या शारीरिक व्यांगाचा उल्लेख केला. त्यामुळे आता तुम्हाला लोकशाही आठवली. तरी कायदा हा आपलं काम करेल. हे त्यांनी लक्षात ठेवावं. कर नसेल तर घाबरायचं कारण नाही. कायद्याला सामोरं जा, असं अतुल भातखळकर यांनी म्हटलं आहे.

संजय राऊत यांना प्रत्युत्तर देतात देवेंद्र फडणवीस म्हणाले की, संजय राऊत हे सध्या व्हिक्टिम कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत आहेत. ते रोज सकाळी उठून हे लोकांचं मनोरंजन करीत आहे. त्यांच्या बोलण्याला आम्ही इतकं महत्त्व देत नाही. सिंह कधी गिधाडाला घाबरला नाही. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने अशा पद्धतीने कधीही काम केले नाही. जे संजय राऊत बोलत आहेत.

महाविकास आघाडीचं सरकार पडणार नाही यामध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हेच मुख्यमंत्री राहतील. त्यांच्या देखील कुटुंबातील लोकांना ईडीच्या माध्यमातून त्रास दिला जात आहे. रोज एक माणूस बेवड्यासारखा बडबडतोय आणि त्याच्यावर ईडी कारवाई करते. आम्ही तुमच्या घरात घुसलो तर तुम्हाला नागरपुराला देखील जाता येणार नाही. माझी यापुढील कुठलीही पत्रकार परिषद शिवसेना भवनात घेणार आहे. त्यानंतरची पत्रकार परिषद हजारो लोकांच्या साक्षीने ईडीच्या कार्यालयाबाहेर घेणार आहे. त्याठिकाणी अनेक गोष्टी उघड करणार असल्याचं खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे.