Shivajirao Adhalarao Patil | तुमच्यामुळे तिनदा खासदार झालो, ही माझी शेवटची निवडणूक, शिवाजीदादांची मतदारांना भावनिक साद

Shivajirao Adhalarao Patil | संपुर्ण देशात एव्हाना राज्यात लोकसभा निवडणुकांचा हंगाम सुरू झाला आहे. अशातच शिरूर लोकसभा मतदारसंघात महायुती तसेच महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचारा शिगेला पोहचला आहे. त्यातच आता शिवाजीराव आढळराव पाटलांनी खेड तालुक्यातील मतदारांना भावनिक साद घातली आहे. यंदा आपलं शेवटचं वर्ष असेल, त्यामुळे खासदार म्हणून आपली निवड करण्याचं भावनिक आवाहन आढळराव पाटलांनी (Shivajirao Adhalarao Patil) खेडच्या मतदारांना केले आहे.

“खेड तालुक्यातील जनतेने मला पहिल्यांदा, दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून दिलं. याचं सगळं श्रेय खेड तालुक्याला जातं. खेड तालुक्यातील जनतेमुळे मी तिनदा खासदार झालो. ३० वर्षे मला या मतदारसंघात काम करताना तुम्ही पाहिले आहे. खेड तालुक्यासह शिरूर मतदारसंघातील कामे करण्यासाठी मला ताकद द्या. ही माझी शेवटची निवडणूक आहे”, असं म्हणत शिवाजीराव आढळराव पाटलांनी जनतेला भावनिक साद घातली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात