मनसे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी घेणार मेळावे – राजेंद्र वागस्कर

MNS – Mahayuti Loksabha Election – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या आदेशानुसार मनसेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते महायुतीचे लोकसभेचे उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारासाठी जीवाचे रान करतील व त्यांचे मताधिक्य वाढवे यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतील अशी ग्वाही मनसेचे नेते आणि पुणे लोकसभा प्रभारी राजेंद्र वागस्कर (Rajendra Wagaskar) व मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी दिली.

प्रचाराचे नियोजन करण्यासाठी भाजपा आणि मनसे च्या प्रमुखांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते यावेळी ते बोलत होते. यावेळी भाजपा चे शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश उपाध्यक्ष व लोकसभा संयोजक राजेश पांडे,लोकसभा प्रभारी श्रीनाथ भीमाले,महायुतीचे समन्वयक व प्रदेश प्रवक्ता संदीप खर्डेकर,पुणे शहर सरचिटणीस राजेंद्र शिळमकर, रवींद्र साळेगावकर, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे उपस्थित होते तर मनसे च्या वतीने नेते राजेंद्र वागस्कर, शहर अध्यक्ष साईनाथ बाबर प्रदेश सरचिटणीस बाळा शेडगे,प्रदेश सरचिटणीस गणेश सातपुते, प्रदेश सरचिटणीस रणजित शिरोळे , योगेश खैरे प्रवक्ते मनसे इ. पदाधिकारी उपस्थित होते.

मनसेने महायुतीला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठिंबा दिल्याने निश्चितच आमची ताकद वाढली असून मुरलीधर मोहोळ हे मताधिक्याचा विक्रम करतील असा विश्वास वाटतो असे भाजपा शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले. मनसे चे कार्यकर्ते दैनंदिन प्रचारात तर सहभागी होतीलच पण स्वतंत्रपणे शहर पातळीवर आणि विधानसभा निहाय मेळावे आयोजित करण्यात येतील असेही या बैठकीत ठरविण्यात आले.

मनसेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी योग्य समन्वय राखला जाईल व प्रचाराच्या नियोजनात मनसे चा सहभाग असेल असे महायुतीचे समन्वयक संदीप खर्डेकर यांनी स्पष्ट केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Amol Kolhe | ‘आमच्या गावासाठी पाच वर्षांत काय केले?’ करंदी ग्रामस्थांचा अमोल कोल्हेंना थेट सवाल

Murlidhar Mohol | मनसेच्या साथीनं महायुतीचे मताधिक्य वाढणार!, मुरलीधर मोहोळ यांनी घेतली अमित ठाकरेंची भेट

Narendra Modi | मोदीजींची विकेट काढायला विरोधकांकडे ना बॉलर ना बॅट्समन, शिंदेंचा विरोधकांवर घणाघात