Indrayani Balan Foundation | ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’कडून ‘एसएनडीटी‘ला ६० संगणकांची भेट

मुलींच्या शिक्षणात अग्रेसर असलेल्या ‘एसएनडीटी कॉलेज’ला ‘इंद्रायणी बालन फाऊंडेशन’च्यावतीने (Indrayani Balan Foundation) ६० अद्ययावत संगणक नुकतेच भेट देण्यात आले. या संगणक लॅबचे उद्घाटन फाऊंडेशनचे अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी एसएनडीटी विद्यापीठाच्या उपकुलगुरू प्रा. उज्वला चक्रदेव, मुख्याध्यापिका डॉ. अंजली कदम यांच्यासह मोठ्या संख्येने प्राध्यापक व विद्यार्थिनी उपस्थित होत्या.

युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) आणि इंद्राणी बालन फाऊंडेशनच्या (Indrayani Balan Foundation) माध्यमातून देशभर मोठ्या प्रमाणात सामाजिक कार्य केले जाते. त्यामध्ये प्रामुख्याने शिक्षण, क्रिडा, संरक्षण या क्षेत्राचा समावेश आहे. शिक्षण क्षेत्र हे विकासाचा पाया रचण्यात शिक्षण क्षेत्राचा मोठा वाटा असल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी मदत केली जाते. याच उद्देशाने ‘एसएनडीटी’ कॉलेजसाठी संगणक देण्यात आले.

यावेळी बोलताना उपकुलगुरू चक्रदेव म्हणाल्या की, ‘‘या आद्ययावत संगणकांमुळे मुलींना अद्ययावत तंत्रज्ञान आत्मसात करण्यासाठी मदत होणार आहे, याआधी संगणकांची संख्या कमी असल्यामुळे मुलींना संगणक शिकण्यासाठी कमी वेळ मिळायचा. पण आता ‘इंद्राणी बालन फाऊंडेशन’ने केलेल्या या अमूल्य मदतीमुळे मुलींना संगणक अधिक वेळ वापरता येईल. या मदतीबद्दल फाऊंडेशनचे अध्यक्ष पुनीत बालन यांचे त्यांनी कृतज्ञतापूर्वक आभारही मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Baramati Loksabha | पाणी प्रश्नावरून अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्यात चांगलीच खडाजंगी

Chandrakant Patil | पराभव समोर दिसत असल्याने संविधान बदलण्याची भाषा! चंद्रकांत पाटील यांचा कॉंग्रेसवर जोरदार प्रहार

Muralidhar Mohol | सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी मेट्रोचा विस्तार करणार