काकीसोबत पुतण्याचं लफडं; काकाने दोघांना रंगेहाथ पकडलं अन् मग केले ‘हे’ कृत्य 

पूर्णिया : बिहारच्या पूर्णियामध्ये पुतण्या आणि काकी (Aunt And Nephew Love Story In Purnea) यांच्यातील अवैध संबंध होते. महिलेच्या पतीने आणि गावकऱ्यांनी त्यांना रंगेहात पकडले. त्यानंतर पुतण्या आणि काकीचा जबरदस्तीने विवाह करण्यात आला. हे प्रकरण पूर्णिया जिल्ह्यातील बनमंखी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिप्रा गावातील प्रभाग 10 मधील आहे.

नात्याला काळीमा फासणाऱ्या या घटनेनंतर सगळेच दुःखी आहेत. महिलेचे वय सुमारे 44 वर्षे असून मुलाचे वय अवघे 14 वर्षे आहे. दोघांच्या वयात 30 वर्षांचा फरक आहे. सर्वात मोठी बाब म्हणजे अल्पवयीन मुलगा महिलेच्या पतीच्या मोठ्या भावाचा मुलगा आहे. दोघांमध्ये काकू-पुतण्याचं नातं आहे.’महिलेला 3 मुलेही आहेत. पती पंजाबमध्ये काम करतो. दोघांमधील प्रेमसंबंध घरच्यांना समजल्यानंतर महिलेच्या पतीला फोनवरून माहिती देण्यात आली. पतीने कोणालाही न सांगता गुपचूप घरी पोहोचून दोघांना रंगेहाथ पकडले.

दरम्यान,  कोणीतरी जबरदस्तीने लग्न करण्याचा व्हिडिओ बनवला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. हा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ही घटना 12 सप्टेंबरची आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.