Shirur LokSabha | “यापूर्वी नटरंगला निवडून दिले, पण यंदा…”, आशाताई बुचकेंचे मतदारांना शिवाजीदादांना निवडून देण्याचे आवाहन

Shirur LokSabha | देशामध्ये मोदी जी आहे आणि त्यांच्या नेतृत्वाखाली दादा आपल्याला आपल्यासमोर आहे. मागच्या पंचवार्षिक मध्ये तुम्ही नटरंगला निवडून दिले होते. प्रत्येकाला ठाऊक आहे गल्लीत काम करणार की दिल्लीत गर्जनारा प्रतिनिधी महत्त्वाचा असतो. प्रत्येकाने पेटून उठा आणि दाखवून द्या. हे मतदारसंघ म्हणजे एक घर आहे आणि ते सांभाळणे हे शिवाजीराव दादाराव पाटील यांच्याशिवाय पर्याय नाही, असे वक्तव्य माजी जिल्हा परिषद सदस्य आशाताई बुचके यांनी केले.

शिरूर लोकसभा (Shirur LokSabha) मतदारसंघाचे उमेदवार शिवाजीराव आढलराव पाटील यांनी जुन्नर गावभेट दौऱ्यावर आहेत. यावेळी श्री समर्थ मंगल कार्यालय येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

तसेच आपल्याला असा खासदार निवडून देण्याची गरज आहे जो आपले प्रश्न दिल्लीत मांडेल. आणि दिल्लीतून निधी आणून आपल्याला मतदार संघाचा विकास करेल, असे शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले.

पुढे बोलताना ते म्हणाले, या निवडणुकीमध्ये प्रामुख्याने विकासाच्या गोष्टी करायला पाहिजे, पण टीका करण्यावर भर दिला जातोय. विद्यमान खासदार गल्ली फिरायचं नाही म्हणतात पण ते विसरून जातात की, गल्लीतली माणसं तुम्हाला दिल्लीत पाठवत असतात. जुन्नर तालुक्यातील विकास कामे फक्त कागदावर आहेत. मला ते प्रत्यक्षात उतरवायचे आहेत. पर्यटनासाठी जुन्नर तालुका सक्षम पर्याय आहे. पर्यटन म्हणून अनेक प्रकार निधी आपण आपल्या तालुक्यात आणू शकतो, असेही त्यांनी यावेळी म्हटले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच