Vikram Kale | धाराशिवमधून अर्चना पाटीलच विजयी होतील, आमदार विक्रम काळेंनी व्यक्त केला विश्वास

Vikram Kale | केंद्रात मोदी सरकारने तर राज्यात महायुतीच्या सरकारने जनतेच्या हिताचे महत्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. महायुतीमधील सर्व घटक पक्षांनी जोमाने प्रचारकार्य सुरू केले आहे. यामुळे धारशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील (Archana Patil) या विजयी होतील, असा विश्वास शिक्षक आमदार विक्रम काळे ( Vikram Kale) यांनी व्यक्त केला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचाराच्या अनुषंगाने आ. काळे यांनी धाराशिव येथे पत्रकार परिषद घेतली. पत्रकार परिषदेस भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नितीन काळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, माजी नगराध्यक्ष अमित शिंदे, नंदकुमार गवारे यांची उपस्थिती होती.

यावेळी पुढे बोलताना आ. काळे म्हणाले, महायुतीच्या उमेदवार पाटील यांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी कॉँग्रेस, शिवसेना, भाजपा व मित्रपक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांकडून जोमाने कार्य सुरू आहे. पालकमंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी ढोकी येथे मेळावा घेवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांना आपआपल्या भागातून महायुतीला मताधिक्य मिळवून देण्याचे आदेश दिले आहेत. मोदी सरकारने या भागाचा विकास व्हावा यासाठी धाराशिव- तुळजापूर-सोलापूर रेल्वे मार्गास मंजुरी दिली. या प्रकल्पासाठी राज्याच्या हिस्स्याचे ४५० कोटी रुपये अर्थमंत्री अजित पवार यांनी मंजूर केले असून हे कामही सुरू झाले असल्याचे आ. काळे यांनी सांगितले.

आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन