Baramati Loksabha | बारामती महायुतीची ताकद आणखीन वाढली, बंजारा समाजाचा सुनेत्रा पवारांना एकमुखी पाठिंबा

बारामती | लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील काही हायव्होल्टेज लढतींमध्ये बारामती लोकसभा (Baramati Loksabha) मतदारसंघाचा देखील समावेश आहे. येथे महायुतीच्या सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) विरुद्ध महाविकास आघाडीच्या सुप्रिया सुळे असा सामना होतोय. सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आता बंजारा समाजाची ताकद उभी राहताना दिसत आहे. राष्ट्रीय बंजारा परिषदेचे ॲड. पंडित भाऊ राठोड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत पाठिंबा जाहीर केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारतामध्ये सुरू असणाऱ्या विकास कामांमुळे आम्ही प्रभावित व उत्साहित आहोत. देशामध्ये नरेंद्र मोदी आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांचा हात मजबूत करण्यासाठी कायम महायुतीच्या पाठीशी आहोत. बारामती मतदार संघामध्ये गोरबंजारा समाज मोठ्या प्रमाणात असून एक गढ़ मतदानासाठी गोरबंजारा समाज हा अत्यंत निर्णायक व प्रभावी आहे. गोरबंजारा समाजामुळे सुनेत्रा पवार यांच्या विजयाचा मार्ग सोपा होणार आहे व मताधिक्य वाढेल” असा विश्वास यावेळी पंडित भाऊ राठोड यांनी व्यक्त केला.

गोरबंजारा समाजामध्ये देशाच्या स्तरावर राष्ट्रीय बंजारा परिषद ही सर्वात मोठी संघटना असून सर्व तांडे धर्मपीठाशी राष्ट्रीय बंजारा परिषदेमुळे जोडले गेल्याने तांडा स्तरावरील नायक, कारभारी, पुजारी व गोरबंजारा समाजाचे, तांडा समिती नायकण, महिला समिती, युवा धर्म रक्षक, गोरबंजारा धर्मपीठाचे पदाधिकारी, पालखीचे पदाधिकारी सर्व राष्ट्रीय बंजारा परिषदेशी निगडित आहेत. राष्ट्रीय बंजारा परिषद गोरबंजारा समाजाचे सर्वात मोठे नेटवर्क असलेली संघटना असल्याने त्यांच्या पाठिंब्यामुळे महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचे मताधिक्य (Baramati Loksabha) वाढण्याचा विश्वास, यावेळी व्यक्त करण्यात आला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Devendra Fadnavis | महायुतीला मोदींचे इंजिन असून हे इंजिन देशातील नव्हे तर जगातील पॉवरफुल इंजिन

Ajit Pawar | बारामतीत काही लोकांनी मी केलेल्या कामांची पुस्तिका छापली, अजित पवारांचा सुप्रिया सुळेंवर हल्लाबोल

Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदी यांच्या सभेची धाराशिवरांना उत्सुकता, ‘या’ दिवशी करणार दौरा