Malhar Patil | देवा-धर्माबद्दल बोलायचं नाही, तुझी हुजरेगिरी राहुल गांधींसमोर; अर्चना पाटलांच्या मुलाचा ओमराजेंवर हल्लाबोल

Malhar Patil | जय श्री राम बोलल्यावर आपल्या अंगावर जो शहारा येतो, तो आपल्या आस्मितेचा, आपल्या धर्माचा विषय आहे. हा विरोधातील माजी खासदार आपल्या देवाची टिंगल करतो. पण मी त्याला सांगू इच्छितो की, माझ्या देवा, धर्मा बद्दल काही बोलायचं नाही. तुला जी काही हुजरेगिरी करायची आहे ती त्या राहुल गांधी समोर कर, असा सल्ला मल्हार पाटील (Malhar Patil) यांनी ओमराजे निंबाळकर यांना दिला.

धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्या प्रचारासाठी त्यांचा मुलगा मल्हार पाटील मैदानात उतरले आहेत. होरटी गावात प्रचार सभेत ते बोलत होते.

मल्हार पाटील म्हणाले, होरटी गाव हा देव धर्म मानणारा गाव आहे. पण उबाठाचे नेते म्हणातात ‘जय श्री राम’ म्हणून लागते का नोकरी? अरे भगवान श्री राम आमच्या हृदयात आहेत. तू कोणाला जॅक देऊन, टॉमी देऊन लागली का नोकरी?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला. तसेच ज्या कारासेवकांनी, राम भक्तांनी राम मंदिरासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. त्यांना आठवून तुमच्या डोळ्यात जे अश्रू आले ते मतदान करताना विसरू नका, असे आवाहन मल्हार पाटील यांनी धाराशिव येथील मतदारांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Chandrashekhar Bawankule | महाराष्ट्राचा महानालायक कोण? या स्पर्धेत उद्धव ठाकरे पहिले येतील, फडणवीसांवरील टीकेला बावनकुळेंचं प्रत्युत्तर

Sunil Tatkare | संविधान बचाव नावाने विरोधकांनी प्रचाराची वैचारिक पातळी खाली आणलीय

Narendra Modi | जनतेवर विश्वास नसलेल्या काँग्रेस आघाडीवर विश्वास ठेवू नका! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन