Google ने जाहीर वर्षातील सर्वोत्कृष्ट गेम आणि अॅप्सची यादी, पाहा कोण ठरलं विजेता

गुगलने 2022 सालासाठी सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड अॅप्स आणि सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड मोबाइल गेम्सची यादी प्रसिद्ध केली आहे. Google ने 2022 साठी क्वेस्टची सर्वोत्कृष्ट Android अॅप म्हणून निवड केली आहे. त्याच वेळी, Apex Legends Mobile Game 2022 चा सर्वोत्कृष्ट Android मोबाइल गेम म्हणून निवडला गेला आहे.

अँड्रॉइड डेव्हलपर दरवर्षी हजारो अॅप्स आणि गेम्स Google Play Store वर सबमिट करतात, त्यानंतर Google वर्षाच्या शेवटी या अॅप्समधून बेस्ट अॅप आणि बेस्ट गेमच्या विजेत्यांची घोषणा करते. Apex Legends मोबाईल गेमने Google च्या सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड मोबाईल गेमच्या यादीत प्रतिस्पर्धी BGMI ची जागा घेतली आहे. मागच्या वर्षी BGMI ला सर्वोत्कृष्ट अँड्रॉइड मोबाईल गेम म्हणून मत मिळाले होते. आता Apex Legends मोबाईल गेमने वर्षातील सर्वोत्कृष्ट गेमचा पुरस्कार जिंकला आहे.

गुगलने जाहीर केलेल्या पुरस्कारांच्या यादीत ई-कॉमर्स श्रेणीतील अॅप्सचाही समावेश करण्यात आला आहे. फ्लिपकार्टच्या शॉप्सी अॅपला यावर्षी युजर चॉइस अॅपसाठी सर्वोत्कृष्ट अॅप म्हणून निवडण्यात आले आहे. त्याचबरोबर अँग्री बर्ड्स जर्नीला बेस्ट यूजर चॉइस गेमचा पुरस्कार मिळाला आहे. तसेच, नींड, बंकरफिट आणि डान्स वर्कआउट हे सर्वोत्कृष्ट आरोग्य अॅप्स म्हणून निवडले गेले आहेत. बेस्ट अॅप्स फॉर फन कॅटेगरीमध्ये टर्निपची निवड करण्यात आली आहे. Google ने फिलो हे ई-लर्निंग अॅप वैयक्तिक वाढीसाठी सर्वोत्तम अॅप म्हणून निवडले आहे.

विजेत्यांची यादी जाहीर करताना, गुगलने सांगितले की 2022 ने भारतातील आणि जगभरातील अनेक लोकांसाठी महामारीनंतरचा काळ बदलला आहे. 2022 मध्ये, लोक पुन्हा एकदा त्यांच्या विविध गरजा पूर्ण करण्यासाठी डिजिटल सोल्यूशन्सवर अवलंबून राहून बाहेरील जगातील शक्यता आणि अनुभवांसाठी स्वत:ला खुले करतात. आम्ही वर्षातील सर्वोत्तम अॅप्स आणि गेमची घोषणा करत आहोत. आमचे वार्षिक पुरस्कार हे सर्वोत्कृष्ट अॅप्स आणि गेम आणि त्यांना जिवंत करणारे डेव्हलपर ओळखण्यासाठी आहेत.