पाकिस्तानात राहूनही तूच सच्चा हिंदुस्थानी.. तारेक फतेह यांच्या निधनानंतर अनुपम खेर बुडाले शोकसागरात

Tarek Fatah Died- पाकिस्तानी वंशाचे प्रसिद्ध लेखक व पत्रकार तारेक फतेह यांचे कँसरने निधन झाले. ते बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. ते ७३ वर्षांचे होते. मुलगी नताशा फतेहने त्यांच्या मृत्यूच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. त्यांच्या निधनानंतर अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. जेष्ठ अभिनेते अनुपम खेर (Anupam Kher) हेदेखील तारेक फतेह यांच्या निधनानंतर शोकाकुल झाले आहेत.

अनुपम खेर यांनी ट्वीटर पोस्ट शेअर करत शोक व्यक्त केला आहे. या पोस्टमध्ये त्यांनी तारेक फतेह यांच्यासोबतचे आपले काही फोटो जोडले आहेत. त्यांनी लिहिले, एक सच्चा भारतीय, एक निर्भीड आणि निर्मळ हृदयाचा माणूस आणि माझा प्रिय मित्र तारेक फतेह याच्या निधनाने मला दु:ख होत आहे. तो प्रचंड धाडसी होता. त्याचे हसणे अस्सल होते. आम्ही अनेक प्रसंगी भेटलो आहोत. पण टोरंटो येथील त्याच्या घरी एक सुंदर दुपार घालवणे आणि स्वादिष्ट खाद्यपदार्थांबद्दल काही उत्तम कथा जाणून घेणे रंजक होते. अशी पोस्ट अनुपम खेर यांनी केली आहे.