”तुमचा फोटो लावणार, ताकद असेल तर काढून दाखवा”, अमरसिंह पंडितांचं शरद पवारांना उलट उत्तर

राष्ट्रवादीतील (NCP) फुटीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या गटाने बीड जिल्ह्यात जाहीर सभा घेतल्या. १७ ऑगस्टला शरद पवारांची सभा झाल्यानंतर काल (२७ ऑगस्ट) अजित पवार गटाची सभा झाली. यावेळी अमरसिंह पंडित (Amarsingh Pandit) यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना उलट उत्तर दिले.

बीडच्या सभेत गेवराई विधानसभा मतदारसंघाचे नेते आणि शरद पवारांच्या अत्यंत जवळचे समजले जाणारे अमरसिंह पंडित यांनी शरद पवारांना प्रेमाचं उत्तर दिलं. ते म्हणाले, तुम्ही म्हणता माझे फोटो लावू नका नाहीतर कायदेशीर कारवाई करु. पण मी म्हणतो शिवछत्रच्या देवघरामध्ये, पंडित कुटुंबाच्या देवघरामध्ये तुमचा फोटो आहे. तो जावून काढा. पाहू तुमच्यात किती ताकद आहे ती.

पंडित पुढे म्हणाले की, साहेब आम्ही तुमच्यावर मनापासून प्रेम केलं. पण मी तुम्हाला विश्वास देता यानंतर निवडणुकांमध्ये नाही लावणार फोटो पण तुमचे संस्कार आमच्या मनातून काढाल का? तुमच्याच संस्काराने आम्ही पुढची लढाई लढू, असं अमरसिंह पंडित म्हणाले.

अमरसिंह पंडितांना काय म्हणाले होते शरद पवार?
अमरसिंह पंडित म्हणतात, शरद पवारांचं वय झालं त्यांच्याकडून आता काय होणार. त्यामुळे मी त्यांना सोडलं. ज्यांना सोडलं त्यांनी निदान वरिष्ठांकडून काही शिकायला मिळालं असेल त्याची जाण ठेवावी” असं शरद पवार म्हणाले होते. यासह अजित पवार गटाने फोटो वापरु नये, असंही नंतर शरद पवार गटाकडून सांगण्यात आलेलं होतं.