Viral Video: चक्क भिकाऱ्याने विकत iPhone 15 Pro Max, दुकानदारापुढे ओतली पोतं भरुन नाणी

Viral Video: सोशल मीडियावर अनेक प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होतात. सध्या आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. एक भिकारी आयफोनच्या (iPhone) दुकानात पोहोचल्याचे दिसून येते. Apple iPhone 15 खरेदी करण्यासाठी तो सोबत नाण्यांनी भरलेली एक पोती घेऊन येतो आणि दुकानदाराला देतो. मात्र, हा प्रँक व्हिडिओ असल्याचे बोलले (Beggar Buys iPhone) जात आहे

या व्हिडिओत दुकानात येणारा भिकारी प्रत्यक्षात भिकारी नाही. दुकानदारांना आश्चर्यचकित करण्यासाठी तो हे करतो. दुकानदारही नाणी मोजत राहतो आणि शेवटी त्याला फोन देतो. हा व्हिडिओ ‘एक्सपेरिमेंट किंग’ या इंस्टाग्राम चॅनलवर शेअर करण्यात आला आहे, जो खूप व्हायरल होत आहे.

व्हिडिओची सुरुवात एका भिकाऱ्याच्या वेशात एका दुकानात iPhone 15 खरेदी करण्यासाठी जात असलेल्या तरुणाने होते. फोन निवडल्यानंतर तो दुकानदाराला नाण्यांनी भरलेली पिशवी देतो. नंतर, व्हिडिओमध्ये दुकानदार नाणी मोजताना दिसत आहेत.

व्हिडिओला 34 दशलक्षाहून अधिक व्ह्यूज आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कमेंट्स मिळाल्या आहेत. एका भिकाऱ्याला एवढा महागडा फोन विकत घेताना पाहून काही लोक आश्चर्यचकित झाले, तर काहींनी दुकानाच्या इन्स्टाग्राम हँडलला व्हिडिओमध्ये टॅग केल्यामुळे संपूर्ण घटनेची स्क्रिप्ट असल्याचे स्पष्ट केले.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा