कारच्या रुफटॉपवर जोडप्याचे अश्लील कृत्य, Lip Kiss करतानाचा व्हिडिओ तुफान व्हायरल

Couple Kiss Viral Video: बऱ्याचदा सोशल मीडियावर जोडप्यांनी रस्त्यावर अश्लील कृती केल्याचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. कधी दिल्ली मेट्रोमध्ये तर कधी मोकळ्या रस्त्यावर लोक किस करताना दिसतात. असाच एक व्हिडिओ सध्या वेगाने व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ तेलंगणातील हैदराबादमधील पीव्ही नरसिंह राव एक्सप्रेस वेचा आहे. यामध्ये एक तरुण आणि तरुणी मोकळेपणाने कारच्या सनरूफमधून मानेला चिकटून एकमेकांना लिप किस (Lip Kiss) करताना दिसले.

व्हायरल क्लिप X वर @DharaniBRS नावाच्या युजरने शेअर केली आहे. कॅप्शनमध्ये हैदराबाद पोलिसांना (Hyderabad Police) टॅग करत त्यांनी लिहिले – असुरक्षित ड्रायव्हिंग आणि लोकांची गैरसोय केल्याबद्दल पोलिस त्यांच्यावर कारवाई करतील अशी आशा आहे. कॅप्शननुसार हा व्हिडिओ हैदराबादचा आहे. अवघ्या 25 सेकंदाच्या क्लिपमध्ये, हे जोडपे कारचे सनरूफ उघडे ठेवून आरामात बसलेले आणि भरपूर रोमान्स करत असल्याचे दिसून येते.

15 ऑक्टोबर रोजी पोस्ट केलेली ही क्लिप हजारो लोकांनी शेअर केली आहे आणि लाखो लोकांनी पाहिली आहे. या व्हिडिओवर यूजर्स संमिश्र प्रतिक्रिया देत आहेत. एका यूजरने लिहिले की, ‘सनरूफवर बंदी घालणे हा एकमेव उपाय आहे’. दुसरा म्हणाला, ‘तुम्ही गाडी घेऊ शकता, रूम नाही’. तिसऱ्या वापरकर्त्याने ‘चित्रपटांचा प्रभाव आहे’ अशी टिप्पणी केली.

महत्त्वाच्या बातम्या-

Navratri : श्री एकविरा देवी नवरात्रोत्सव यात्रेनिमित्त जुन्या मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतुकीत बदल

Navratri : नवरात्रोत्सव काळात मेट्रो सेवा रात्री १२ पर्यंत सुरु ठेवा; Atul Bhatkhalkar यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

नवरात्रीत स्वत:ला एक सुंदर लुक द्यायचा असेल तर या टिप्स अवश्य फॉलो करा