ब्रेकिंग! एक वर्षाच्या कारावासानंतर अखेर अनिल देशमुख यांना जामीन मंजूर

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांना सोमवारी (दि. १२ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर केला आहे. अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे.

मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर ७४ वर्षीय अनिल देशमुख नोव्हेंबर २०२१पासून तुरुंगात होते. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी असून ते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात होते.