Dharashiv LokSabha | नरेंद्र मोदींच्या सभेनंतर अर्चना पाटलांसाठी पती राणाजगजितसिंहांचा जोरदार प्रचार सुरू

धाराशिव | धाराशिव लोकसभा (Dharashiv LokSabha) मतदारसंघात महायुतीच्या अर्चना पाटील आणि महाविकास आघाडीचे विद्यमान खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांच्यात थेट लढत होत आहे. यातच अर्चना पाटील यांच्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर सभा घेतली. त्यामुळे सध्या धाराशिव मतदारसंघातील राजकीय वातावरणाने दिशा बदलली असल्याचे दिसत आहेत. तर दुसऱ्या बाजूला अर्चना पाटील यांचे पती भाजप आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी देखील अर्चना पाटलांसाठी आपला जोरदार प्रचार (Dharashiv LokSabha) सुरू केला आहे.

अर्चना पाटील यांच्यासाठी राणाजगजितसिंह पाटील यांनी औसा तालुक्यातील उजनी येते आठवडी बाजारात पदयात्रा काढली. यावेळी त्यांनी व्यापारी, शेतकरी, महिला व ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. पाटील यांनी मतदारांना आवाहन करत केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार येणार आहे. त्यामुळे निधीचा ओघ आपल्याकडे वळविण्यासाठी निवडून येणारा खासदार हा आपल्या हक्काचा असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. तेव्हाच आपल्या भागाचा सर्वांगीण विकास हो ऊ शकतो. तेव्हा येत्या निवडणुकांमध्ये महायुतीला प्रंचडड मताधिक्क्याने विजयी करा, असे आवाहन देखील त्यांनी मतदारांना केले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?