Rohit Pawar | “स्वतःचं आसन अस्थिर झाल्यानं मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली”, रोहित पवारांची मोदींवर आगपाखड

Rohit Pawar |  महाराष्ट्रात अनेक अतृप्त आत्मे फिरत आहेत. जे घर अस्थिर करतात. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील एका नेत्यांमुळे आज राज्य अस्थिर झाले आहे. सुमारे 45 वर्षांपूर्वी 1995 मध्ये देखील त्यांनी शिवसेना – भाजपच सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न केला होता. केवळ राज्य नव्हे तर आपला पक्ष देखील यांनी अस्थिर केला. त्यामुळे राज्याचे अनेक मुख्यमंत्री आपला कार्यकाळ देखील पूर्ण करू शकले नाही, अशी जहरी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी कॉँग्रेस (शरदचंद्र पवार) चे अध्यक्ष व माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्यावर नाव न घेता केली.

दरम्यान, नरेंद्र मोदींनी शरद पवारांवर केलेल्या टीकेमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शरद पवार गटाकडून मोदींवर आगपाखड करण्यात येत आहे. “महाराष्ट्र हे आमचं शरीर म्हणजेच पंढरी आहे आणि विठ्ठल हा या पंढरीतला आत्मा आहे. म्हणूनच स्वतःचं आसन अस्थिर झाल्याचं लक्षात येताच मोदींना महाराष्ट्राची आठवण झाली, पण इथे येऊन त्यांनी विठ्ठलाचं दर्शन घेण्याऐवजी त्यांना अस्थिर आत्मे दिसू लागले आहेत”, असं शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | मोदींच्या नेतृत्वात भारत बनेल तिसरी मोठी अर्थव्यवस्था, मुरलीधर मोहोळ यांचा विश्वास

Eknath Shinde | ज्या गोष्टीचा खेद वाटायला हवा त्याचा उबाठाला अभिमान वाटतोय

Narendra Modi | ओबीसी आरक्षण मुस्लिमांना देण्याचा काँग्रेसचा कर्नाटकी कट हाणून पाडा, पंतप्रधान मोदींचे आवाहन