अनिल देशमुख हे भाजपाच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत – सचिन सावंत

मुंबई: महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सोमवारी (दि. १२ डिसेंबर) मुंबई उच्च न्यायालयाने भ्रष्टाचाराच्या आरोपात जामीन मंजूर केला आहे. (Former Maharashtra Home Minister Anil Deshmukh has been granted bail by the Bombay High Court.). अनिल देशमुख यांना एक लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मिळाला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने अटक केल्यानंतर ७४ वर्षीय अनिल देशमुख नोव्हेंबर २०२१पासून तुरुंगात होते. यावर्षी एप्रिलमध्ये त्यांना सीबीआयने भ्रष्टाचाराच्या प्रकरणात अटक केली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडी असून ते मुंबईच्या आर्थर रोड कारागृहात होते.

दरम्यान, या घडामोडींवरून आता राजकीय प्रतिक्रिया देखील येत आहेत.याबाबत कॉंग्रेस नेते सचिन सावंत म्हणाले, अनिल देशमुख यांना जामिन मिळाला याचे समाधान आहे. भाजपाच्या विखारी राजकारणाचे ते बळी आहेत. विरोधकांमध्ये भीती पसरविण्यासाठी १२० धाडी टाकल्या व आतच ठेवण्याचा प्रयत्न केला. खूनाच्या आरोपीला माफीचा साक्षीदार व नं १ ला संरक्षण हे गेल्या ८ वर्षांत देशातील विदारक चित्राचा भाग आहे असं त्यांनी म्हटले आहे.