Ajit Pawar | मी साहेबांना कधीही सोडलं नाही, अजित पवार शरद पवारांबद्दल काय म्हणाले?

Ajit Pawar | राज्यात वाढत्या तापमानाच्या पाऱ्याप्रमाणे राजकीय वातावरण देखील तापू लागले आहे. पण सर्वात जास्त राजकीय तापमान वाढलंय ते बारामती लोकसभा मतदार संघात. कारण येथे सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशी लढत आहे. त्यामुळे अजित पवार विरुद्ध शरद पवार असे चित्र पाहायला मिळत आहे. प्रचाराच्या प्रत्येक ठिकाणी पारावर, चौका चौकात ‘अजित पवारांनी साहेबांना या वयात सोडायला नको होतं’ ही एकच चर्चा आहे. त्यावर अजित पवार (Ajit Pawar) यांनी इंदापूरच्या सभेत उत्तर दिल. सध्या त्यांचे वक्तव्य राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनला आहे.

अजित पवार म्हणाले, बऱ्याच जणांना हा प्रश्न आहे की अजित पवारांनी शरद पवारांपासून वेगळे होण्याचा निर्णय का घेतला?. आपण सगळ्यांनी माझी कारकीर्द पाहिली आहे. १९८४ मध्ये भवानीमाता पॅनल केलं होतं तिथे मला संचालक तुम्ही केलंत. तिथून माझी राजकीय सुरवात झाली. राजकारणात येईन असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. कारण एक घाव दोन तुकडे हा माझा स्वभाव आहे. एखादं काम होणार असेल तर हो म्हणून सांगतो, नसेल होणार तर नाही सांगतो. मला उगाच कुणाला हेलपाटे घालून द्यायला आवडत नाही. ”

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, काही जण म्हणतात या वयात दादांनी साहेबाला सोडायला नको होतं, पारावर अशी चर्चा करतात. मित्रांनो मी साहेबांना कधीही सोडलं नाही. १९८७ पासून २०२३ पर्यंत साहेब (शरद पवार) म्हणतील ती पूर्व दिशा. मी तुम्हाला आज आवर्जून सांगतो. लहान असताना आजी आजोबांनी सांगितलं होतं आपलं सगळं कुटुंब शेतकरी कामगार पक्षाचं होतं. स्वर्गीय वसंत दादा पवार हे पोटनिवडणुकीला उभे होते. त्यावेळी शरद पवार हे महाविद्यालयात होते. त्यावेळी शरद पवारांनी आमच्या थोरल्या काकांना विरोध केला. अख्खं पवार कुटुंब शेकापच्या बाजूने होतं. त्यावेळी शरद पवारांनी विरोधी काम केलं. ही सुरुवात झाली. त्यानंतर १९६७ मध्ये शरद पवार उभे राहिले. प्रत्येकाला संधी मिळते. हर्षवर्धन पाटील यांनाही नंतर संधी मिळाली. शरद पवारांनी मला संधी दिली. शरद पवारांना यशवंतराव चव्हाणांनी निवडणुकीची संधी दिली होती, असेही पवार यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?