…पण कोणालाही मुख्यमंत्री बनता येत नाही; अजित पवारांच्या मुख्यमंत्री होण्याच्या इच्छेवर फडणवीस स्पष्टच बोलले

पुणे – नुकत्याच एका मुलाखतीत विरोधीपक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी मुख्यमंत्री बनण्याची इच्छा व्यक्त केली होती. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू असून राजकीय नेत्यांच्या त्यावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच अजित पवारांच्या मुख्यमंत्री बनण्याच्या विधानावर विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy CM Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मी अजितदादांची मुलाखत पाहिली नाही, कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. मुख्यमंत्री व्हायला आवडणं हे काही वावगं नाही. अनेकांना मुख्यमंत्री व्हायला आवडतं पण होता येतं असं नाही, आमच्या अजितदादांना शुभेच्छा, अशा शब्दांत देवेंद्र फडणवीसांनी अजित पवारांना टोमणा मारला आहे.