Bhalchandra Mungekar | राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपाला सत्तेतून तडीपार करा

Bhalchandra Mungekar | लोकसभेची निवडणूक ही लोकशाही विरुद्ध हुकूमशाही अशी असून मोदी पुन्हा सत्तेत आले तर राज्यघटना बदलून देशात हुकूमशाही राजवट येईल. आरएसएसचा तर राज्यघटनेला पहिल्यापासूनच विरोध आहे. भाजपाचा ४०० पारचा नारा हा राज्यघटना बदलण्यासाठीच आहे, त्यामुळे घटना बदलणार नाही असे नरेंद्र मोदी कितीही सांगत असले तरी त्यांच्यावर विश्वास ठेवता येणार नाही. मोदी पुन्हा सत्तेत आले की राज्यघटना बदलणार त्यामुळे लोकशाही व राज्यघटना अबाधित ठेवण्यासाठी भाजपा व नरेंद्र मोदींना सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन माजी खासदार डॉ. भालचंद्र मुणगेकर (Bhalchandra Mungekar) यांनी केले आहे.

प्रदेश काँग्रेसचे मुख्यालय टिळक भवन येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिन उत्साहात पार पडला. यावेळी बोलताना डॉ. मुणगेकर यांनी उपस्थितांना व राज्यातील जनतेला महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा दिल्या. ते पुढे म्हणाले की, भारतीय जनता पक्षाचा लोकशाही व राज्यघटनेवर विश्वास नाही. माजी सरसंघचालक गोलवलकर यांनी राज्यघटना ही गोधडी आहे असे म्हटले होते. भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी ४०० जागांचे बहुमत मिळाले की राज्यघटना बदलणार हे जाहीरपणे सांगितले आहे. पंतप्रधान मोदींचे आर्थिक सल्लागार यांनीही नवीन राज्यघटना करणे गरजेचे असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आता प्रत्येक प्रचार सभेत राज्यघटना बदलणार नाही असे सांगत असले तरी त्यांच्यावर कोणीही विश्वास ठेवणार नाही. काँग्रेसने राज्यघटना बदलली असा भाजपाकडून अपप्रचार केला जात आहे पण घटनेत दुरुस्ती करणे आणि घटना बदलणे याच फरक आहे. मोदी सरकारनेही निवडणूक आयुक्त नियुक्तीसंदर्भात नुकतीच घटना दुरुस्ती केली आहे.

लोकसभेसाठी दोन टप्प्यातील मतदान झाले असून भाजपाचा पराभव होत असल्याचे चित्र आहे, पराभवाच्या भितीने मोदी घाबरले असून आता ते, “मी फक्त निमित्त मात्र आहे, ईश्वरानेच मला पाठवले आहे” असे सांगत आहेत, याचा अर्थ मी देवाचा अवतार आहे, असे सांगून नरेंद्र मोदी जनतेची दिशाभूल करत आहेत असे मुणगेकर म्हणाले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?