Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Murlidhar Mohol: जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील. गिरीश बापट यांना सव्वातीन लाखांचे मताधिक्क होते. यापेक्षा दुप्पट मताधिक्क मोहोळ (Murlidhar Moho) यांना द्यायचे असेल तर प्रत्येक बुथवर ७५ टक्के मतदान होणे व त्यातील ७५ टक्के मतदान महायुतीला होणे आवश्यक आहे. त्यासाठी आपल्याला काम करायचे आहे. अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिलीय. काल महायुतीकडून मोठं शक्तिप्रदर्शन करत मुरलीधर मोहोळ यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. त्यावेळी ते बोलत होते.

तर पुणेकरांमध्ये प्रचंड उत्साह असून २०१४ व २०१९ मध्ये जनतेने महायुतीवर विश्वास ठेवला. गिरीश बापट यांनी शहारात चांगले काम केले आणि आता तरूण तडफदार उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. ते प्रचंड मतांनी निवडून येतील. महायुतीमध्ये सर्व काही योग्य पद्धतीने सुरू असून, मागील वेळेपेक्षा जास्त जागा निवडून येतील. जनता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे उभी आहे. असं राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Pune Loksabha | मोहोळ प्रचंड मताने निवडून येतील, देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

Shivajirao Adhalarao Patil | राऊतांसारखी कोल्हेंनी सकाळी उठून काहीही बडबड करू नये, आढळरावांनी का साधला निशाणा?

Amol Kolhe | केंद्रातील सरकार बदलणार ही काळ्या दगडावरची रेष, अमोल कोल्हेंचा सूतोवाच