Krunal Pandya | आयपीएलदरम्यान पांड्या बंधूंच्या घरी आला नवा पाहुणा, कृणाल पांड्या दुसऱ्यांदा बनला बाबा

Krunal Pandya Son | आयपीएल 2024च्या रणधुमाळीदरम्यान पांड्या ब्रदर्सच्या घरी एक मोठी बातमी आली आहे. हार्दिकचा भाऊ कृणाल पांड्या दुसऱ्यांदा वडील झाला आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर ही माहिती दिली आहे. कृणाल पांड्याची पत्नी पंखुरी शर्मा हिने मुलाला जन्म दिला आहे. आयपीएल दरम्यान पांड्या कुटुंबासाठी हा खूप आनंदाचा क्षण आहे. हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्सचा कर्णधार आहे, तर क्रुणाल पंड्या लखनऊ सुपर जायंट्स संघाचा भाग आहे ज्याचे नेतृत्व केएल राहुल करत आहे. 21 एप्रिल रोजी कृणाल आणि पंखुरी दुस-यांदा पालक बनले, ज्याची माहिती आता या क्रिकेटरने चाहत्यांशी शेअर केली आहे.

कृणाल पांड्याने (Krunal Pandya) त्याच्या सोशल मीडिया हँडल ‘X’ वर छोट्या पाहुण्यासोबतचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये कृणाल त्याची पत्नी पंखुरी शर्मा आणि मोठा मुलगा कवीर कृणाल पंड्यासोबत दिसत आहे, तर पंखुरी घरातील लहान पाहुण्याला आपल्या मांडीत धरताना दिसत आहे. लहान मुलाचे नाव वायु कृणाल पंड्या असे आहे. फोटोसोबत कृणालने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘वायू क्रुणाल पांड्या 21.04.24’

कृणाल पांड्या आणि पंखुरी शर्मा यांनी 27 डिसेंबर 2017 रोजी एकमेकांशी लग्न केले. पाच वर्षांनंतर, दोघेही पहिल्यांदा पालक झाले, जेव्हा त्यांनी त्यांच्या पहिल्या मुलाचे स्वागत केले आणि त्याचे नाव कवी कृणाल पंड्या ठेवले. आता त्यांच्या दुसऱ्या मुलासह पांड्या कुटुंबात तीन मुले आहेत. क्रुणालचा धाकटा भाऊ हार्दिक पांड्याला एक मुलगा आहे, त्याचे नाव त्याने अगस्त्य पांड्या ठेवले आहे. तिन्ही भावांमध्ये अगस्त्य हा सर्वात मोठा. त्याचा जन्म 2020 च्या जुलै महिन्यात झाला होता.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | जेवढी मतदानाची टक्केवारी वाढेल, तेवढ्या महायुतीच्या जागा जास्त निवडून येतील – चंद्रकांत पाटील

Shirur LokSabha | “मी डमी नाही तर डॅडी उमेदवार आहे”, आढळराव पाटलांचे अमोल कोल्हेंचे प्रत्युत्तर

Sunetra Pawar | केंद्र व राज्य सरकारचा दुवा बनून समस्यांचं निराकरण करणार; सुनेत्रा पवार यांचे प्रतिपादन