Raigad LokSabha | “जाहीर सभांना जशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केलात तसेच रेकॉर्ड ब्रेक मतदान करुन मला तुमची सेवा करण्याची संधी द्या”

Raigad LokSabha | सुधागड तालुक्यातील आजच्या सभा या रेकॉर्ड ब्रेक झाल्या असून जशी रेकॉर्ड ब्रेक गर्दी केलात तसेच रेकॉर्ड ब्रेक मतदान करुन मला तुमची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा (Raigad LokSabha) मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे (sunil tatkare) यांनी केले.

हे राष्ट्र नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सुरक्षित राहिले आहे म्हणून आम्ही नरेंद्र मोदींच्या सरकारमध्ये सहभागी झालो आणि आमच्या लोकसभा निवडणुकीत जाहिरनाम्यामध्ये ‘राष्ट्रासाठी राष्ट्रवादी’ हा मंत्र देण्यात आला आहे असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी जे बिल मांडले होते ते बिल परदेशातून आल्यावर फाडणारे राहुल गांधी ही तुमची वृत्ती सर्वांनी पाहिली आणि आज तुम्ही मोदी सरकारवर संविधान फाडणार असल्याचा आरोप करत आहात असे थेट प्रत्युत्तर सुनिल तटकरे यांनी देताना त्यावेळी मनमोहन सिंग राजीनामा देणार होते ही वस्तुस्थिती समोर मांडली.

रायगड लोकसभा मतदारसंघात असलेल्या गावात अनंत गीते यांचे मतदार यादीत नाव नाही. ज्या व्यक्तीचे स्वतः चे मत या मतदारसंघात नाही. जे आपले मत गेली आठ टर्म फुकट घालवत आहेत त्या व्यक्तीला लोकांच्या मतांची किंमत काय समजणार असा जबरदस्त टोला सुनिल तटकरे यांनी लगावला.

पेण विधानसभा मतदारसंघात सुधागड तालुक्यातील परळी येथे महायुतीची जाहीर प्रचार सभा मोठ्या उत्साहात पार पडली.

या जाहीर सभेला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि रायगड लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार खासदार सुनिल तटकरे,माजी मंत्री आमदार रविंद्र पाटील, माजी आमदार आणि भाजप जिल्हाध्यक्ष धैर्यशील पाटील, प्रकाश देसाई आदींसह राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, भाजप, मनसे, आरपीआयचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol : पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्याला प्राधान्य असेल, मुरलीधर अण्णांचा विश्वास

Narendra Modi : शेतकऱ्यांना फसविणाऱ्या नेत्यांना धडा शिकवण्याची वेळ, नरेंद्र मोदींचा शरद पवारांवर हल्लाबोल

Vijay Shivtare : सुनेत्रा पवारांना फक्त उमेदवारी मिळाल्यावर किती बदल झाला, खासदार झाल्यावर तर काय होईल?