Chandrashekhar Bawankule | कोकणातील जनतेची पसंती महायुतीलाच! पदवीधर निवडणुकीत महायुतीचाच उमेदवार विजयी होणार!

Chandrashekhar Bawankule | लोकसभा निवडणुकीत कोकणच्या मतदारांनी पसंती देऊन भाजपा महायुतीला यश मिळाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राज्यातील महायुती सरकार वर मतदारांनी विश्वास दाखविल्याची ही पावती आहे, याचपद्धतीने विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघातून भाजपा महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे रेकॉर्ड मतांनी विजयी होणार असल्याचा दावा भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी केला.

कोकण पदवीधर मतदार संघाच्या निवडणूक प्रचारासाठी भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी गुरुवारी (दि. १३) रोजी पालघर व ठाणे जिल्ह्याचा दौरा केला. पालघर जिल्ह्यातील विक्रमगढ, मनोर, नालासोपारा आणि ठाण्यातील मिरा रोड (पूर्व) या भागात भाजपासह महायुतीच्या घटक पक्षातील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. महायुतीमधील सर्व घटक पक्ष एकदिलाने काम करीत असून त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येणार आहे, असे सांगून त्यांनी मागील अडीच वर्षातील महायुती सरकारची कामगिरी, लोकहिताचे निर्णय व सरकारने पदवीधरांसाठी आखलेल्या विविध योजना माहिती मतदारांपर्यंत पोहचवावी, असे आवाहन केले. आ. निरंजन डावखरे यांनी सभागृहात पदवीधरांच्या समस्यांना सातत्याने वाचा फोडून न्याय मिळवून दिला आहे. त्यांनी केलेल्या विकासकामांची माहिती मतदारांना मिळावी यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी केले.

बावनकुळे यांच्या या प्रचार दौऱ्यात पालघरचे खा. हेमंत सावरा, आ. संजय केळकर, जिल्हाध्यक्ष भरत राजपूत, जिल्हाध्यक्ष महेंद्र पाटील, राजेंद्र गावित, राजन नाईक, हेमंत म्हात्रे, नंदकुमार पाटील, बापूजी सर, सुशील औसरकर, सुरेखा थेतले, हरिश्चंद्र भोये, प्रवीण संखे, सुशील औसरकर, बापूजी काडोळे, पंकज कोरे, विलास तरे, अमित घोडा, जगदीश राजपूत, अशोक घडे, वीणाताई देशमुख, मनोज पाटील, प्रज्ञाताई पाटील, जोगेंद्रप्रसाद चौबे, अभय कंकड, सुनील केणी, जे पी सिंग यांच्यासह मोठ्या संख्येने भाजपा व महायुती घटक पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप