‘बाकीचे मंडळाचे देवही पावतात’, म्हणणाऱ्या नेटकऱ्याला मराठमोळ्या अभिनेत्रीचं सणसणीत उत्तर

Actress Ruchira Jadhav: मुंबईतील मानाच्या गणपतींपैकी एक असलेला लालबागच्या राजाची (Lalbaugcha Raja) जगभरात ख्याती आहे. नवसाला पावणारा बाप्पा म्हणून प्रसिद्ध असलेल्या या राजाच्या दर्शनसाठी देशभरातून भक्तांची रांग लागते. मराठमोळी अभिनेत्री रुचिरा जाधव लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेलीय. रुचिराने सोशल मिडीयावर गणपती बाप्पासोबतचे (Ganpati Bappa) खास फोटो शेअर केलेत. मात्र यावर एका चाहत्याने लक्ष वेधून घेणारी कमेंट केलीय.

रुचिराने लालबागच्या राजासोबतचे खास फोटो सोशल मिडीयावर शेअर केलेत. या फोटोखाली एका नेटकऱ्याने केलेली कमेंट व्हायरल झालीय. ‘बाकीचे मंडळाचे पण पावतात देव बर का नवसाला’, अशी कमेंट नेटकऱ्याने केलीय. त्यावर रुचिराने सुद्धा त्याला सणसणीत उत्तर दिलंय.

“मी नवस करत नाही. मी बाप्पाला भेटायला जाते. आणि मुळात नेहमी काहीतरी मागण्यापेक्षा, जे दिलंय त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला आवडतं मला”, असं उत्तर रुचिराने दिलंय.

महत्वाच्या बातम्या-
Relationship Depression आहे खूप धोकादायक, दोन आयुष्य उध्वस्त होऊ शकतात

‘माझा विश्वास आहे की अल्लाह सर्व काही…’ वर्ल्डकप संघातून बाहेर पडल्यावर नसीम शाह भावूक

Sharad Ponkshe : ‘बाजीराव पेशवे हा छत्रपती शिवरायांच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा धुरंधर वीरपुरुष होता’