Shivajirao Adhalarao Patil | अजित पवारांच्या उपस्थितीत शिवाजीराव आढळराव पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज

लोकसभा निवडणुकांसाठी महायुतीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) आणि त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. आढळरावांना शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवाीर देण्यात आली असून आज उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला.

‘शिरुर लोकसभा मतदारसंघातून आढळराव पाटील (Shivajirao Adhalarao Patil ) हेच विजयी होतील, असा विश्वास यावेळी अजित पवारांनी व्यक्त केला. मात्र, आढळराव पाटलांना किती मताधिक्य मिळेल? या प्रश्नावर मी काही ज्योतिषी नाही’, असेही त्यांनी परखडपणे सांगितले आहे.

शिरुर लोकसभा मतदारसंघात आढळराव पाटील विरुद्ध महाविकास आघाडीचे डॉ. अमोल कोल्हे यांच्यात थेट लढत आहे. अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटलांचा विरोध करुन दिल्ली गाठली होती. आता, यंदाही दोन्ही उमेदवारांना एकमेकांचे आव्हान आहे. मात्र, गत निवडणुकीत कोल्हेंच्या पाठिशी असलेले अजित पवार यंदा आढळराव पाटलांचा प्रचार करत आहेत. आढळराव पाटील यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज मोठं शक्तीप्रदर्शन करुन रॅली काढण्यात आली. या रॅलीत अजित पवार गॉगल घालून सहभागी झाले होते. यावेळी, त्यांना विचारलेल्या विविध प्रश्नावर उत्तर देताना आपल्या उमेदवाराचा विजय निश्चित असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Jay Pawar | संसदरत्न फार मोठा पुरस्कार नाही; जय पवार यांची पहिल्यांदाच सुप्रिया सुळेंवर थेट टीका

Ajit Pawar | ‘बायको म्हणाली, अहो हे काम करुन द्या, तर करावेच लागणार, नाहीतर…’; अजित पवारांचे मिश्किल वक्तव्य

Pune LokSabha | शिंदे आणि अजित पवारांची जी उंची होती, ती आज राहिली नाही; काँग्रेसच्या नेत्याने जखमेवर चोळले मीठ