“धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये ! बावनकुळेंचं थेट खटक्यावर बोट 

औरंगाबाद – गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचा अपमान हा कळीचा मुद्दा बनला समाहे. यातच आता विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांच्या एक वक्तव्य सध्या चर्चेत असल्याचं पहायला मिळतंय. आपण जाणीवपुर्वक छत्रपती संभाजी महाराजांना स्वराज्यरक्षक संभाजी महाराज म्हणतो. काही जण धर्मवीर म्हणतात. राजे धर्मवीर नव्हते, असं अजित पवारांनी (Ajit Pawar)  म्हटले आहे.

छत्रपती संभाजी महाराजांना आपण स्वराज्यरक्षक म्हणतो, काही जण मात्र धर्मवीर म्हणतात. संभाजी महाराज धर्मवीर नव्हते. संभाजी महाराजांनी कधीच कुठे धर्माचा पुरस्कार केला नाही. शिवाजी महाराजांनीही हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावर काही जण जाणीवपूर्वक धर्मवीर असे म्हणतात. मी मंत्रिमंडळात असताना, निर्णय घेताना सगळ्यांना सांगायचो की, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज असा उल्लेख आपण करावा, असे अजित पवार म्हणाले.

दरम्यान, आता यावरून आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवारांवर शरसंधान केले आहे. “धरणवीर” असणाऱ्यांनी धर्मवीरांबद्दल बोलूच नये ! असं ट्वीट करत बावनकुळे यांनी शेलक्या शब्दात अजित पवारांचा समाचार घेतला आहे. अजितदादा, आपल्या स्वार्थासाठी सर्व ठिकाणी settlement करणाऱ्यांना काय कळणार धर्मासाठी त्याग काय असतो ते ? होय धर्मवीरच ! छञपती धर्मवीर संभाजी महाराजांना मानाचा मुजरा. असं देखील त्यांनी म्हटले आहे