Ajit Pawar | शिरुरच्या बारा गावांचा दुष्काळ संपविणार हा माझा शब्द

Ajit Pawar | बारा गावांच्या दुष्काळ संपवायचा आहे आणि तो हा अजित पवार संपवेल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी या विषयाबाबत मार्ग काढलेला आहे, सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) आणि शिवाजीराव आढळराव यांनीही प्रयत्न केल्याने या प्रश्नाबाबत सर्व्हेक्षणाचे आदेशही झालेले आहेत. त्यामुळे मी आत्ताच शब्द देतो बारा गावांचा दुष्काळ मी संपविणार फक्त मतदानात बिल्कूल हयगय न करता शिवाजीराव आढळरावांना विजयी करा असे म्हणत अजित पवार (Ajit Pawar) यांनी केंदूर (ता.शिरूर) येथील प्रचार सभा गाजविली.

सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास केंदूर येथील श्रीराम चौकात सभा सुरू होताच अजित पवार यांनी थेट आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे यांना बोलायला दिले. सौ.साकोरे यांनी या भागाती दुष्काळ, येथील पाणी प्रश्न आणि त्यासाठी वळसे-आढळरावांसह देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या बैठकांची माहिती दिली. दरम्यान सौ.साकोरे यांच्यानंतर अजित पवार यांनी लगचे बोलायला उभे राहून पूर्वीचा बारामती आणि आत्ताचा शिरुर मतदार संघ असा मतदार संघ आढावा घेत आपण सन १९९२ मध्ये येथे खासदार राहिल्याने येथील सर्व प्रश्न ज्ञात असल्याचे सांगितले. मुळचे केंदूर येथील असलेले माजी दिवंगत खासदार बापूसाहेब थिटे यांच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या खासदारकीच्या निवडणूकीची संपूर्ण जबाबदारी आपण घेतल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमाला आमदार मेघना बोर्डीकर-साकोरे, पुणे जिल्हा दुध संघाच्या माजी अध्यक्षा केशरताई पवार, जिल्हा बॅंकेच्या माजी उपाध्यक्षा जयश्री पलांडे, भिमाशंकरचे उपाध्यक्ष प्रदीप वळसे पाटील, माजी सभापती प्रकाश पवार, तालुकाध्यक्ष मानसिंग पाचुंदकर, उपसभापती सविता प-हाड, प्रमोद प-हाड, सविता बगाटे, माजी सरपंच सुवर्णा थिटे, सतीश थिटे, भगवानराव शेळके, चंदन सोंडेकर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन राम साकोरे यांनी केले तर आभार सरपंच अमोल थिटे यांनी मानले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Muralidhar Mohol | उद्योगांच्या विकासाला चालना देऊन बेरोजगारीची समस्या सोडविणार

Sharad Pawar | राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचं काँग्रेसमध्ये विलिनकरण होणार? शरद पवारांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

Narendra Modi | इंडी आघाडीचा ‘मिशन कॅन्सल’ कार्यक्रम हाणून पाडा! पंतप्रधान मोदी यांचे आवाहन