मोठी बातमी : किशोर आवारे हत्याप्रकरणात राष्ट्रवादीच्या ‘त्या’ आमदाराचा हात?

पुणे : मावळातील तळेगांव दाभाडे येथे जनसेवा विकास समितीचे किशोर आवारे (Kishore Aware) यांची काल दिवसाढवळ्या हत्या (Murder of Kishore Aware) करण्यात आली. तळेगाव अज्ञात हल्लेखोरांनी आवारे यांच्यावर आधी गोळ्या झाडल्या त्यानंतर धारदार शस्त्रांनी त्यांच्यावर वार करून फरार झाले. या घटनेला काही तासही उलटत नाही तोच या प्रकरणाला वेगळे वळण लागलं आहे.

माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, या प्रकरणी आता मावळचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदार सुनील शेळके (Sunil Shelke) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (A case has been registered against NCP MLA Sunil Shelke in the murder of Kishore Aware). मयत किशोर आवारे यांच्या आई सुलोचना आवारे (वय ६९, तळेगाव) यांनी तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानुसार आमदार सुनील शेळके, भाऊ सुधाकर शेळके, संदीप गराडे यांच्यासह अन्य तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किशोर आवारे हे जनसेवा विकास समितीच्या माध्यमातून तळेगावच्या राजकारणात सक्रिय होते. नगरपरिषद निवडणुकीत त्यांनी समितीचे नगरसेवक देखील निवडून आणले होते. राजकारणात त्यांचे वाढते प्रस्थ अडचणीचे ठरत असल्याने आमदार शेळके यांच्यासह सुधाकर शेळके यांच्याकडून वारंवार त्रास दिला जात होता. किशोर आवारे यांनी या लोकांकडून आपल्या जीवाला धोका असल्याचे सांगितले होत. असं सुलोचना आवारे यांनी फिर्यादीत म्हटले आहे.