Chhagan Bhujbal | आगामी विधासभेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला सन्मानपूर्वक जागा मिळाल्याच पाहिजेत

Chhagan Bhujbal | लोकसभा निवडणुकीत 2019 ला निवडून आलेल्या जागांचा निकष आमच्यासाठी लावण्यात आला. आता विधानसभेला लोकसभेसारखी जागावाटपाची खटपट होता कामा नये. यासाठी आताच भाजपाला त्यांनी 80-90 जागा देण्याचा शब्द दिलेला त्याची आठवण करून द्या, अशी मागणी छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी केली. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयोजित राष्ट्रवादी काँग्रेसच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

आपण महायुतीमध्ये आलो तेव्हा भाजपाने शब्द दिलेला. विधानसभेला महायुतीमध्ये योग्य वाटा मिळायला हवा.आम्हाला एवढ्या जागा हव्यात हे त्यांना सांगावे लागेल. जर 80-90 जागा मिळाल्या तर 50-60 निवडून येतील. आता 50 आहेत म्हणजे आम्ही 50 जागा घेऊ असे होणार नाही. आताच सांगून टाका आमचा वाटा आम्हाला मिळाला पाहिजे म्हणून अशी मागणी भुजबळ यांनी केली. भुजबळ यांनी अजित पवारांकडे केली आहे.

ते पुढे म्हणाले की, नुकत्याच राज्यात लोकसभा निवडणुका होऊन गेल्या आता आगामी काळात विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आचारसंहिता लागेल या काळामध्ये सर्व आमदारांच्या मतदारसंघातील कामे खोळंबता कामा नये यासाठी आपण अगोदरच निवडणूक आयोगाला पत्रव्यवहार करावा.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप