कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा, मी तुमच्या पाठीमागे आहे – अब्दुल सत्तार 

परभणी – अरे ला कारे करा. कोणी एक मारली तर तुम्ही चार मारा. मी तुमच्या पाठीमागे आहे. काही काळजी करू नका. पण हे करताना कुणावर अति करू नका. अन् कुणाची अति सहनही करू नका, असं वक्तव्य राज्याचे कृषी मंत्री अब्दुल सत्तार (abdul sattar) यांनी केलं आहे.

हे घरी बसल्याने आता शिवसैनिकांवर आंदोलन करण्याची वेळ आली आहे. मुख्यमंत्री असताना आपल्याच पक्षातील आमदार आणि कार्यकर्त्यांना काहीच दिलं नाही. आता काय देणार? असा सवाल अब्दुल सत्तार यांनी केला.पुढची सत्ता येण्याची स्वप्न कधी दहा जन्म बी पूर्ण होणार नाही, हे मी सांगतो, असं त्यांनी म्हटलं आहे.

मी पण कार्यकर्ता आहे. मलाही सर्व कळतं. घरात बसून, पडद्याच्या आड बसून चालत नाही. तर सरदार शिवाजी महाराजांप्रमाणे सर्वात पुढे असावा लागतो, असा टोलाही त्यांनी लगावला.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 18 अठरा तास काम करतायेत. मग मुख्यमंत्री झोपतात कधी याचा एक पोटशूळ विरोधकांना आहे. ते झोपतात कधी असं विरोधक विचारत आहेत. ते झोपतात कधी पेक्षा ते काय करू लागले हे बघा. घरात बसून जमणार नाही तर त्यासाठी मैदानात उतरावं लागतं, असा सल्ला त्यांनी दिला.