Pankaja Munde Sugar Factory: पंकजा मुंडे या अध्यक्ष असलेल्या कारखान्याचा होणार लिलाव 

Pankaja Munde: परळी वैदनाथ सहकारी साखर कारखाना हा गेल्या काही दिवसांपासून चांगलाच चर्चेत आहे. या कारखान्यावर 203 कोटी 69 लाख रुपये थकीत असून थकित कर्जाच्या वसुलीसाठी वैद्यनाथ कारखान्याच्या लिलावाची प्रक्रिया युनियन बँक ऑफ इंडियाने जाहीर केली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे या कारखान्याच्या अध्यक्षा आहेत.

युनियन बँकेने यापूर्वी सुद्धा वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचा लिलाव होणार असल्याची नोटीस दिली होती. 203 कोटींच्या कर्ज वसुलीसाठी युनियन बँकेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कारखान्याकडे तब्बल 203 कोटी रुपयांचे कर्ज थकीत असून कर्जवसुलीसाठी कारखान्याच्या मालमत्तेचा लिलाव ऑनलाइन पद्धतीने केला जाणार आहे.

यासाठीची प्रक्रिया 25 जानेवारी रोजी पार पडणार असल्याचेही नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. नोटीसमध्ये वैद्यनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाची नावे आहेत. दरम्यान यापूर्वीच पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्यावर जीएसटी विभागाने देखील दंड ठोठावला होता. यानंतर आता ही कारवाई झाल्याने कारखाना पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.