शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; अज्ञात व्यक्तिविरोधात मुंबईत गुन्हा दाखल

Mumbai –  राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी कालच आपला वाढदिवस साजरा केला. पवार यांच्यावर अजूनही शुभेच्छांचा वर्षाव होत असताना आता शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी आल्याची माहिती मिळत आहे. मुंबईतील (Mumbai News) सिल्व्हर ओक (Silver Oak) येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करुन धमकी दिल्याची माहिती मिळत आहे.

शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक येथील घरी अज्ञात व्यक्तीनं फोन करून पवार यांना जीवे मारण्याची धमकी दिली. मुंबई आकाराचे देशी बनावटीचे पिस्तुल घेऊन ठार मारणार असल्याचं सांगितलं आहे.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फोन करणाऱ्या अज्ञात व्यक्तिनं हिंदीत धमकी दिली. बंगल्यावर तैनात असलेल्या पोलीस ऑपरेटरच्या तक्रारीवरून गावदेवी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. एबीपी माझा या वृत्तवाहिनीने याबाबत वृत्त दिले आहे.